भारतीय 9 मिनिटांत ऑनलाइन खरेदी करतात...

    29-Oct-2020
Total Views |
 
२५-_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर (वि.प्र.) : काेराेनामुळे लाेक आता ऑनलाइन खरेदीवर जास्त अवलंबून राहत आहेत.यामुळे निर्णय घेण्याचा वेळ कमी झाला आहे. भारतीय ग्राहक फ्नत 9 मिनिटांत ऑनलाइन खरेदीचा निर्णय घेतात.फ्लिपकार्ट आणि बेन अँड कंपनीच्या संयु्नत पाहणीचा हा निष्कर्ष आहे.या अहवालानुसार भारतीय लाेक काेणतीही वस्तू ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी अंदाजे 20 प्रकारची मिळतीजुळती उत्पादने बघतात. माेबाइल आणि इले्नट्राॅनिक वस्तूंची संख्या 50 ते 60 पर्यंत वाढत जाते, तर फ्नत सविस्तर माहिती 50% लाेकच घेतात. इंग्लंडमधील लाेक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी 30 मिनिटे लावतात, तर भारतीय फ्नत 9 मिनिटांत ऑनलाइन खरेदी करून माेकळे हाेतात.इंग्लंडमधील लाेक रिव्हू वाचण्यात आणि खरेदी करण्यात 30 मिनिटे वेळ लावतात.इंग्लंडमध्ये 2000 लाेकांचा सर्व्हे केल्यानंतर ही माहिती उपलब्ध झाली आहे. ऑनलाइन खरेदी वाढण्याची कारणे उत्पादनाच्या किंमतीवर 80% पर्यंत सूट आता भारतात सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. परंतु, या आमिषाला बळी पडून ‘बंपर सूट’ या माेहाला बळी पडून कधीही ऑनलाइन खरेदी करू नका.कारण काेणतीही कंपनी नुकसान साेसून तुम्हाला कमी किमतीत वस्तू देणार नाही, हे उघड गुपित आहे. वस्तूंची खरी किंमत करण्यासाठी त्या वस्तूचा सेल सुरू हाेण्यापूर्वी किती किंमत हाेती याची माहिती मिळवा. यानंतर तुम्हाला खराेखरच सूट मिळते की, नाही हे कळेल.