लष्कराला मदत करणारा ऑनलाइन गेम येताेय

    29-Oct-2020
Total Views |

.;p_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 28 ऑ्नटाेबर (वि.प्र.) : ऑनलाईन गेमच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पब्जीवर बंदी आणल्यानंतर सरकारने फाैजी (F AU-G) हा गेम आणणार असल्याची घाेषणा केली हाेती. त्यानुसार आता नाेव्हेंबरमध्ये हा गेम भारतीयांच्या भेटीस येताेय.फाैजी हा मेड इन इंडिया सरकारने आणला आहे. अभिनेता अक्षय कुमारने या गेम्सचा टीझर लाँच केलाय. (F AU-G) गेम तयार करणाऱ्या एम काेअर गेम्स कंपनीने ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली.थाेडक्यात या वेबसाईटने ही बातमी दिली आहे. (F AU-G) गेमच्या टीझरमध्ये युद्ध सुरू असल्याचं दिसतंय. भारतीय सैनिक इतर सैनिकांवर हल्ला करताहेत, शिवाय भारताचा झेंडादेखील डाैलाने फडकताना या व्हिडीओमध्ये दिसताेय. (F AU-G) हा गेम ‘भारत के वीर’ या ट्रस्टला पाठिंबा देणारा आहे. त्यामुळे यातून मिळालेला 20 टक्के नफा भारतीय लष्कराला देण्यात येणार आहे.