नवउद्याेजकांची पावले आता छत्तीसगड, मध्य प्रदेशाकडे

    29-Oct-2020
Total Views |
‘स्टार्टअप’अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळते प्राेत्साहन
 
 
mk8_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर (वि.प्र.) : नवउद्याेजकांना प्राेत्साहन देण्यासाठी सरकारने ‘स्टार्टअप’ याेजना सुरू केली.व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यात मदत केली जाते. उद्याेग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पायाभूत सुविधांची गरज असते. त्या निकषावर प्रगत राज्ये आघाडी घेतात. पण आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तुलनेने कमी विकसित राज्यांतही ‘स्टार्टअप’ वाढायला लागले आहेत.केंद्र सरकारने 2019मध्ये जारी केलेल्या ‘स्टार्टअप रँकिंग्ज’मध्ये मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांचा ‘इमर्जिंग स्टार्टअप इकाेसिस्टिम’ असा उल्लेख करण्यात आला आहे. काेणत्याही देशाची प्रगती तेथील औद्याेगिकतेवर ठरते.अमेरिका, जपान, चीन, जर्मनी यासारख्या देशांकडे पाहिले तर तेथील औद्याेगिक प्रगती लगेच लक्षात येते.उद्याेगांमुळे राेजगारांची निर्मिती हाेते, अर्थव्यवस्थेला चालना मिळून संपत्ती निर्माण हाेते आणि बंगळुरू किंवा गुरुग्राममध्ये काेणताही ‘स्टार्टअप’ सुरू करताना तुमच्यासमाेर दाेन ते तीन प्रतिस्पर्धी असतात.पण छत्तीसगडमध्ये ही संख्या कमी असल्यामुळे नवउद्याेजकांना फायदा मिळताे, असे ते म्हणतात.स्पर्धक कमी असल्यामुळे तुम्ही स्पर्धेपेक्षा आपल्या उद्याेगाच्या विकास आणि वाढीकडे लक्ष केंद्रित करू शकता, असे हेमंत पाेद्दार यांनी नमूद केले.‘स्टार्टअप’अंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळते प्राेत्साहन समाजात समृद्धी येते. उद्याेगांच्या विकासासाठी कमीत कमी अडथळे असणारी यंत्रणा आणि साेबत पायाभूत सुविधा उत्तम असाव्या लागतात. भारतात नवउद्याेजकांना प्राेत्साहन देण्यासाठी सरकारने ‘स्टार्टअप’ याेजना सुरू केली.हे उद्याेग आजवर प्रामुख्याने दिल्ली, गुरुग्राम आणि बंगळुरूसारख्या महानगरांमध्ये विकसित झाले. त्याचे कारण म्हणजे या शहरांमध्ये असलेल्या सुविधा आणि उद्याेगांना अनुकूल वातावरण. साहजिकच उद्याेजकांनी अशी शहरे निवडून काम सुरू केले. पण बदलत्या काळाबराेबर नवउद्याेजकांचा दृष्टिकाेन बदलत चालला असून, त्यांनी या महानगरांव्यतिरिक्त अन्य राज्यांमध्ये व्यवसाय सुरू केले आहेत.त्यात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांचा समावेश हाेताे.