औषध निर्माण उद्यानासाठी मुरूड, राेह्यात जमीन निश्चिती

    29-Oct-2020
Total Views |
मुंबई, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) : मुरूड व राेहा तालुक्यातील 17 गावांमधील एकूण 1994.969 हेक्टर क्षेत्र औषध निर्माण उद्यानाची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) अधिसूचित करण्यात आले आहे, अशी माहिती उद्याेग विभागाने दिली. रायगड जिल्ह्यातील 40 गावांमधील अंदाजे 13408.473 हेक्टर जमीन एकात्मिक औद्याेगिक वसाहतीसाठी सिडकाेने अधिसूचित केली हाेती. केंद्राच्या रसायन व खते मंत्रालयाच्या 2 जूनच्या अधिसूचनेनुसार, औषध निर्माण विभागाने औषध निर्माण उद्याने विकसित करण्यासाठी प्राेत्साहन देण्यासंदर्भातील याेजनेनुसार राेहा व मुरूड तालुक्यातील 17 गावांतील एकूण 1994.969 हेक्टर क्षेत्रावर औषध निर्माण उद्याने विकसित करण्यासाठी एमआयडीसीने सिडकाेला हे क्षेत्र विनाअधिसूचित करण्याबाबत विनंती केली हाेती. त्यानुसार सिडकाेने हे क्षेत्र विनाअधिसूचित केले आहे.