अतिरिक्त आयुक्तांकडून अचानक नेरूळमधील बाजारपेठांची पाहणी

    29-Oct-2020
Total Views |

n78_1  H x W: 0
 
नवी मुंबई, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) : नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढाेले यांनी प्रशासन व परिमंडळ 1चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डाॅ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत नेरूळ विभागातील विविध ठिकाणच्या बाजारपेठांना अचानक भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली.अतिरिक्त आयुक्तांच्या या दाैऱ्यामुळे विक्रेते आणि नागरिकांची धांदल उडाली.मास्क न घालता वावरणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत ढाेले यांनी त्यांना समज दिली, तसेच मास्क न घालता येणाऱ्या नागरिकांना दुकानात प्रवेश न देण्याच्या सूचना दुकानदारांना केल्या. नेरूळला सेक्टर-1 मधील शिरवणे मार्केट, तसेच नेरूळ स्थानकालगतच्या परिसरातील प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करत असतानाच ढाेले यांनी नेरूळ विभागाचे सहायक आयुक्त अनुप डेरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.मार्केट परिसरातील फेरीवाल्यांवर नियंत्रण आणण्याबाबत त्वरित व नियमित कारवाईचे निर्देश त्यांनी डेरे यांना दिले. मास्क, साेशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अशाच प्रकारच्या सूचना इतर सर्व विभाग अधिकाऱ्यांना द्याव्यात, असेही ढाेले यांनी चाबुकस्वार यांना सांगितले.काेराेना प्रसाराचा धाेका ओळखून नागरिकांनी आराेग्य सुरक्षेच्या बाबींचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहनही ढाेले यांनी केले.