ब्रिटिश उपायुक्तांशी आदिती तटकरे यांची चर्चा

    29-Oct-2020
Total Views |

b1]_1  H x W: 0
 
मुंबई, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) : महाराष्ट्र उद्याेग क्षेत्रात कायम अग्रेसर असून, काेव्हिड काळातही माेठ्या प्रमाणात येथे परदेशी गुंतवणूक झाली आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने राज्यातील पर्यटन स्थळांवरही अधिक साेयीसुविधा पुरवल्या जात असून, जास्तीत जास्त पर्यटकांसाठी याेग्य त्या सुविधा पुरवण्याबराेबर स्थानिक राेजगार वाढवण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे, असे राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. लाॅकडाऊन काळानंतर राज्यातील परिस्थिती पूर्ववत हाेत असतानाच राज्यातील उद्याेग, पर्यटन, फलाेत्पादन, क्रीडा व युवक कल्याण या विविध विभागांच्या माध्यमातून शासनाच्या धाेरणाविषयी तटकरे यांनी शुक्रवारी ब्रिटिश उपउच्चायुक्तालयाचे उपायुक्त लन गेमेल व मंत्री परिषदेच्या सदस्य कॅटी बज यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
मुंबईची सद्यस्थिती, येथे असलेली गुंतवणुकीची संधी, नैसर्गिक आपत्ती काळात महाराष्ट्राने केलेल्या विविध उपाययाेजनांची माहिती तटकरे यांनी दिली.