बिस्मिल्ला खान

    29-Oct-2020
Total Views |

b56_1  H x W: 0
 
उस्ताद बिस्मिल्ला खाँ हे ख्यातनाम भारतीय सनईवादक हाेते. तुम्ही सर्व मंगलकार्यात जी सनई ऐकता ती आहे उस्ताद बिस्मिल्ला खाँ ह्यांची. 1959 च्या प्रकाश पिक्चर्सच्या ‘गूँज उठी शहनाई’ या बाेलपटातल्या वादनानंतर खानसाहेबांना रसिकमनांत खास स्थान मिळवून दिलं. आणि त्यानंतर उस्ताद बिस्मिल्ला खाँ केवळ भारतातच नाही, तर जगात लाेकप्रिय झाले. त्यांना अनेक महत्त्वाचे सन्मान आणि पुरस्कार मिळाले. 2001 साली त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वाेच्च सन्मान मिळाला आहे. त्यांचा जन्म 21 मार्च 1916 राेजी डुमराव, बिहार येथे झाला. तर 21 ऑगस्ट 2006 राेजी त्यांचा मृत्यू झाला.‘संगीत’ हाच त्यांचा धर्म हाेता. उत्तर भारतात सनई हे दरबारी वाद्य हाेते. प्रभाती व सायंकाळी ते दरबारात वाजविले जाई. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ हे भारतीय कीर्तीचे श्रेष्ठ सनईवादक हाेत. त्यांनी या जुन्या पारंपरिक लाेकवाद्याला अभिजात संगीतवाद्याचा दर्जा व जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली.