अमेरिकेत पुढील वर्षी मुलांचा जन्मदर घटण्याची शक्यता

29 Oct 2020 12:51:53
आर्थिक संकटाचा आणि बेराेजगारीचा परिणाम
 
ब६७ल._1  H x W:
 
वाॅशिंग्टन, 28 ऑक्टोबर (वि.प्र.) : काेराेना महामारीचा परिणाम आपल्या जीवनातील सगळ्यांच घटकांवर झाला आहे. राेजगार गेल्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या असून, त्यांचा परिणाम मुलांच्या जन्मावर हाेणार आहे.पुरेसे आर्थिक बळ नसणे हे त्याचे मुख्य कारण आहे. अमेरिकेतील 34 टक्के महिलांनी सध्या हा निर्णय घेतला आहे.या अनिश्चित परिस्थितीत मातृत्वाची जबाबदारी निभावण्याची त्यांची तयारी नाही.काेराेना महामारीचा सर्वांत माेठा फटका राेजगाराला बसला आहे. वाढत्या बेराेजगारीचे चटके अमेरिकेसारख्या संपन्न देशालाही बसायला लागल्यामुळे पुढील वर्षात (2021) अमेरिकेत मुलांच्या जन्माचे प्रमाण कमी हाेईल, असे भाकीत अर्थतज्ज्ञ आणि कुटुंबतज्ज्ञांनी केले आहे. पुढील वर्षी अमेरिकेत पाच लाख कमी मुले जन्मतील, असे त्यांचे म्हणणे आहे. अमेरिकन महिला आगामी काही वर्षे मुलांना जन्म देणे टाळतील, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2019 मध्ये अमेरिकेत 38 लाख मुले जन्माला आली हाेती. त्यात पुढील वर्षी तेरा टक्के घट हाेण्याची शक्यता आहे.
 
Powered By Sangraha 9.0