जगातील सर्वांत माेठा आणि उंच बाैद्ध स्तूप

    29-Oct-2020
Total Views |

n56_1  H x W: 0 
 
जगातील सर्वांत माेठा आणि उंच बाैद्ध स्तूप भारतात आहे. त्याचे नाव आहे केसरिया स्तूप.केसरिया स्तूप हा बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात, पाटण्यापासून 110 किमी आहे. हा स्तूप 30 एकर परिसरामध्ये पसरलेला आहे. जवळजवळ 1,400 फूट (430 मीटर) वर्तुळाकार आणि 104 फूट (32 मीटर) उंची असलेला हा जगातील सर्वात उंच स्तूप आहे.भारतीय सर्वेक्षण संस्थेने स्तूपाला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घाेषित केले आहे. पण एक लाेकप्रिय पर्यटन आकर्षण असूनही, केसरिया अद्याप विकसित झालेले नाही आणि स्तूपाचा माेठा भाग अद्याप झाडीमध्येच आहे. गाैतमबुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या भक्त-अनुयायांनी त्याची रक्षा, केस व त्याच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे स्मृतिप्रीत्यर्थ संवर्धन करून त्यावर छाेटे-माेठे स्तूप उभारलेत. बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाचे संस्मरणीय प्रसंग ज्या ज्या ठिकाणी घडले, त्या ठिकाणी स्तूप आणि अन्य स्वरूपाची स्मारके उभारली गेली. मध्य प्रदेशातील भाेपाळपासून 40 कि.मी. अंतरावरील हा महास्तूप देशाचा राष्ट्रीय ठेवा आहे. सम्राट अशाेकाने बाैद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर बाैद्ध धर्म प्रसारासाठी ज्या वास्तू, स्तंभ उभारले त्यातील ही जगविख्यात वास्तू. अशाेकाने बांधकाम केलेली ही मूळ वास्तू खरं तर लहान स्वरूपात हाेती. मात्र त्याच्या पश्चात त्याचे वारसदार व अनुयायांनी त्याचे आकारमान विस्तृत केले. या स्तूपाचा व्यास सुमारे 120 फुटांचा आहे.