जगातील काही सर्वांत सुंदर फुले

    29-Oct-2020
Total Views |

br45_1  H x W:
 
आपल्या भारतात विविध प्रकारची आणि सुंदर फुले आहेत, जी जगात प्रसिद्ध आहेत. त्या पैकी एक म्हणजे अग्निशिखा. हे फूल उमलले की ते 4-5 दिवस ताजे राहते. फुलांचा पिवळा-लाल रंग जाऊन नंतर ताे पूर्ण लालभडक हाेताे. याच्या सुंदर फुलांमुळेच या वेलीची शाेभेची वनस्पती म्हणून लागवड करतात. फुले आकाराने माेठी असतात. जुलै ते ऑक्टाेबर या काळात वेलीला फुले येतात. फुले सुकली की फुलाचा खालचा भाग फळात रूपांतरित हाेताे.अग्निशिखा हे भारतातील तमिळनाडू या राज्याचे राज्यफूल आहे.
लिली ऑफ व्हॅली हे जगातील एक अतिशय सुंदर आणि महागडे फूल आहे. परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल हे फूल चक्क विषारी असते. परदेशामध्ये शाही आणि श्रीमंत लाेकांच्या लग्नात ही फुले सजावटीसाठी वापरली जातात.केसर हा पदार्थ तुम्हाला माहिती असेल. श्रीखंडात आपण केसर घालताे ते चव येण्यासाठी. तर हे जे केसर असते ते खूप महाग असते. ते मिळते ते फुलापासून. ही फुले हाताने ताेडावी लागतात व त्यातील पराग म्हणजे केसर ही हातानेच निवडावे लागते. ऑर्किडचे सुंदर पांढरे फूल तुम्ही न्नकीच पाहिले असेल. इतके सुंदर फूल असते परंतु ह्याचे जे झाड असते ते फार काही सुंदर नसते.मध्यरात्री फुलणारे आणि दिवस हाेताच मावळून जाणारे, दिसायला अतिशय सुंदर आणि सुगंधित असणारे ब्रह्मकमळ हे जगातील एक सुंदर फूल समजले जाते.