दिवाळीत एसटीतून कॅशलेस प्रवासाची सुविधा

    29-Oct-2020
Total Views |

b56_1  H x W: 0
 
स्मार्ट कार्ड दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू करणार; राेख पैसे न देता तिकीट मिळू शकणार
 
मुंबई, 28 ऑक्टाेबर (आ.प्र.) : यंदाच्या दिवाळीत प्रवाशांना एसटीतून कॅशलेस प्रवास करता येणार आहे. 11 ते 22 नाेव्हेंबर याकाळात प्रवाशांसाठी जादा गाड्या सुरू करण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. एसटीचे प्रवासात सवलती देणारे स्मार्ट कार्ड दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार आहे. हे कार्ड बस स्थानकांऐवजी खासगी कंपनीतील एजंटकडे उपलब्ध हाेईल. ते जवळ असल्यास प्रवाशांना राेख पैसे द्यावे लागणार नाहीत.दिवाळीनिमित्त सुट्ट्या आणि हिवाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी माेठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडतात.तीर्थयात्रांसाठी हाच काळ ज्येष्ठ नागरिक पसंत करतात.त्यामुळे याकाळात एसटी गाड्यांसाठीची मागणी वाढते.परिणामी, याकाळात नियमित गाड्यांव्यतिरिक्त यंदा 1000 जादा गाड्या चालवण्यात येतील, असे एसटीकडून सांगण्यात आले. केंद्राच्या डिजिटल इंडिया उपक्रमानुसार एसटीत कॅशलेस प्रवास सुरू करण्यासाठी ओटीसी (ओव्हर द काउंटर) स्मार्ट कार्ड दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येईल. या कार्डमध्ये ट्रॅव्हल वाॅलेट आणि शाॅपिंग वाॅलेटचा समावेश असेल. हे कार्ड घेण्यासाठी खासगी एजंटकडे नाव आणि माेबाइल क्रमांक नाेंदवणे आवश्यक आहे. कार्ड रिचार्जसाठी खासगी एजंटकडे संपर्क साधावा, असे एसटीने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, 8 ते 22 नाेव्हेंबरदरम्यान खूप सार्वजनिक सुट्ट्या आहेत.लाॅकडाऊनमुळे घरातच असलेला पर्यटक यानिमित्ताने बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात 11 ते 16 नाेव्हेंबरदरम्यान अधिकाधिक प्रवासी एसटीला प्राधान्य देतील, अशी अटकळ आहे. 17 ते 22 नाेव्हेंबरदरम्यान या प्रवाशांचा, तसेच पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू हाेईल.लक्ष्मीपूजन, पाडवा अशा मुहूर्तावर गावी पाेहाेचणाऱ्या गाड्या त्या ठिकाणी मुक्कामी राहतील व दुसऱ्या दिवशी प्रवाशांना प्रवासासाठी गाड्या मिळतील, अशी व्यवस्था करण्याचे आदेश वाहतूक विभागाने दिले आहेत.