जिवावर उठणारे जीवजंत

28 Oct 2020 11:31:25
खाजवलं गेल्यानं डाेक्याला जखम हाेऊ शकते, त्यातून रक्त येऊ शकतं. केसांखाली ते असल्याने आपल्याला दिसले नाही तरी केसापेक्षाही हजारपट बारीक असणाऱ्या जीवजंतूंना ते दिसते.
 
 
1[]_1  H x W: 0
 
उंदरांमुळे प्लेगची साथ पसरते. काही वर्षांपूर्वी सुरत शहरात प्लेगची साथ आली हाेती.तेव्हा तिथल्या पाेलिसांनी अधिकाऱ्यांनी उंदरांना मिळणारी रसद ताेडली.म्हणजे त्यांना आयते खाद्यपदार्थ मिळण्याच्या वाटा राेखल्या. घरातले, हाॅटेलातले, रस्त्यावरचे, टपऱ्यांमधले, धान्याच्या गाेदामातले खाद्यपदार्थ बेवारसपणे इतस्तत: पसरणार नाहीत याबद्दल लाेकांना जाणीव करून दिली. शहराचा काेपरान् काेपरा चकाचक केला.उंदीर-घुशींची बिळे लिंपून बंद केली. त्यांना माणसाच्या संपर्कापासून दूर ठेवले.
आपण माणसेच त्यांना पाेसताे. आपल्याही घरात, गल्लीत, माेहल्ल्यात, भागात, गावात कितीतरी अन्न विनाकारण इकडेतिकडे कचऱ्यात पसरलेले असते. त्याची याेग्य ती काळजी न घेतल्यास केव्हाही प्लेगची साथ येऊ शकतेच..ते नकाे असेल तर आपला परिसर चकाचक ठेवायला हवा. स्वच्छता राहिली तर उंदीर जातील, घुशी जातील, डुकरं जातील, डास जातील, कचऱ्यातले वळवळणारे कृमी-कीटकही जातील.आपल्या कचरा करण्यातूनच तर आपण त्यांना पाेसत असताे. या, डाेळ्यांना दिसू शकणाऱ्या; पण माणसाच्या आयुष्यावर उठलेल्या प्राण्यांमध्ये आपल्याला हानिकारक असणारे राेगजंतू प्रचंड असतात. त्यांचाही बंदाेबस्त स्वच्छता केल्यानं हाेताे. नियमितपणे डाेक्यावरचे केस धुवून, विंचरून घेतले तर डाेक्यात उवा हाेत नाहीत. त्यामुळे डाेकं खाजवावं लागत नाही.खाजवलं गेल्यानं डाेक्याला जखम हाेऊ शकते त्यातून रक्त येऊ शकतं.केसांखाली ते असल्यामुळे ते आपल्याला दिसले नाही तरी केसापेक्षाही हजारपट बारीक असणाऱ्या जीवजंतूंना ते दिसते. ते रक्तातले अन्नघटक वापरतात आणि धष्टपुष्ट हाेतात.
डाेक्यावरच्या केसांच्या मुळाशी असलेल्या त्या इवल्याशा जखमेतून शरीरात शिरण्याची वाट बंद झालेली नसली तर थेट तुमच्या शरीरात घुसतात. मग काय त्यांना चरायला रानच माेकळं मिळतं.ते गुणाकाराच्या पटीत वाढत जातात.एका सूक्ष्मजीवापासून दाेन सूक्ष्मजीव तयार हाेण्यासाठी अगदी वीस मिनिटंसुद्धा पुरतात.माझ्या हिशाेबाप्रमाणे एका सूक्ष्मजीवापासून 90 लाख काेटी सूक्ष्मजीव तयार हाेण्यासाठी बारा ताससुद्धा खूप झाले.
 
Powered By Sangraha 9.0