वऱ्हाडींनी दुर्बिर्णीने पाहिला अमेरिका-कॅनडा सरहद्दीवर विवाहसाेहळा

    28-Oct-2020
Total Views |

१_1  H x W: 0 x
 
काेराेनामुळे अनेक सामजिक प्रथा बदलल्या आहेत. त्यात विवाहाचाही समावेश आहे. काेराेनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने परदेशातील लाेकांना अमेरिकेत प्रवेश करण्याची बंदी आहे.त्यामुळे अमेरिकन वधू लिंडसे ्नलाॅज आणि कॅनेडियन वर एले्नस लेकी या जाेडप्याने दाेन्ही देशांतील लाेकांच्या शुभेच्छा मिळाव्यात म्हणून अमेरिका-कॅनडा सरहद्दीवर विवाह साेहळा आयाेजित केला व या विवाहासाठी आलेल्या दाेन्ही देशांतील पाहुण्यांनी या विवाहाचा विधी दुर्बिणीद्वारे पाहिला.हा विवाह सरहद्दीवरील कॅनडाच्या न्यू बंसविक प्रांतातील सेन्ट क्र्निस या नदी किनाऱ्यावर झाला. नदीच्या एका किनाऱ्यावर नवरदेवाचे, तर दुसऱ्या किनाऱ्यावर वधूचे नातेवाईक उभे राहून दुर्बिणीतून हा विवाह साेहळा पाहत हाेते. नदीच्या पिकनिक स्पाॅटवर फक्त वर-वधू आणि पादरी व माेजकेच नातेवाईक हजर हाेते, तर एका माेटरबाेटीत बसून दाेन्ही कुटुंबातील सदस्यांनी विवाह साेहळा पाहिला. काेराेनामुळे अमेरिका-कॅनडामध्ये फ्नत 30 लाेकांना विवाह साेहळ्यात सहभागी हाेण्याची परवानगी आहे.