तारुण्याची हाैस घेऊन गेली कारुण्यात!

28 Oct 2020 11:56:39

./'[_1  H x W:
 
हे व्यंगचित्र एका पक्ष्याच्या संदर्भातलं आहे, पण प्रत्यक्षात ते माणसाच्या अजरामर हाेण्याच्या आणि चिरतरुण राहण्याच्या हाैसेवर भाष्य करणारं आहे. आपली एक गैरसमजूत असते की, आपले पूर्वज फार सकस अन्न खात हाेते म्हणून ते दीर्घायुषी हाेते. जगातल्या सगळ्या पुराणकथांमध्ये चिरंजीव म्हणजे ज्यांना मृत्यू स्पर्शच करत नाही, अशा व्यक्तिरेखा आहेत. शिवाय सगळ्या देवांचं, महापुरुषांचं आयुर्मान दीडशे दाेनशे वर्षांचं आहे, अशी समजूत हाेते या कथा वाचल्यावर. वास्तव मात्र याच्या उलट आहे. अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे 1900 सालापासून 1950 पर्यंत ज्या थाेर व्यक्तींचं निधन झालं, त्यांचं वय आजच्या हिशाेबात जाण्याचं नव्हतं. चाळिशीच्या आसपासच लाेक निरवानिरव करायला घ्यायचे. पन्नाशी गाठली तर फार झालं आणि साठी गाठली तर मग माेठाच पराक्रम झाला.म्हणूनच तर पन्नाशी आणि साठीचे वाढदिवस इतक्या जाेरात साजरे केले जायचे. मरणाला सगळं जग घाबरतं. त्यामुळे ते आलंच नाही तर किती छान! त्यात म्हातारं हाेऊन जिवंत राहण्यापेक्षा चिरतरुण राहता आलं, तर किती बहार येईल. इथे असंच एक चिरतारुण्याचं कारंजं आहे. तिथे तारुण्याचं वरदान मागितलं की मिळतं. इथे दाेन पक्षी येऊन बसले हाेते.
थाेड्या वेळाने दुसरा दिसेनासा झाला, त्याच्याजागी अंडं दिसायला लागलं.म्हणजे त्याने तारुण्याचं वरदान मागितल्यावर त्याला डायरेक्ट अंड्यात पाठवलं त्या कारंजाने!
 
Powered By Sangraha 9.0