आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे स्वरूप काय आहे, हे जाणून घ्या

    28-Oct-2020
Total Views |
केवळ परदेशात शिक्षण घेणं यास परदेशी शिक्षण असं म्हणत नाहीत, आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या पैलूला समजून घेणं आवश्यक आहे. विदेशात शिक्षण देणाऱ्या संस्था काेणकाेणत्या पैलूंना उत्तम शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण मानतात, ते समजून घेऊन त्याचा अवलंब करणे हा एकमेव पर्याय आहे, शिक्षणाच्या पातळीला उत्तम बनविण्याचा...
 
 
,.;_1  H x W: 0
 
आंतरराष्ट्रीय शिक्षणाला समजणं तेवढं आवश्यक आहे, जेवढं त्याला प्राप्त करण्याची इच्छा बाळगणे. परदेशी शिक्षण कशाला म्हणावं? केवळ परदेशात शिक्षण घेणं याचा अर्थ परदेशी शिक्षण असा आहे का? याला आपण दाेन स्तरांमध्ये समजून घ्यायला हवं. अर्थात दाेन्ही बिंदूंचा निष्कर्ष एकच असेल. तरीही सर्व पैलूंचा अभ्यास करणे उत्तम ठरेल. पहिला पूर्ण जगाला आधार मानून आणि दुसरा भारताला आधार मानून.आणखी एक पैलू असेल याविषयी समजून घेण्याचा ताे म्हणजे शिक्षण जे केवळ शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारावर नाेकरी देत नाही तर त्या विशेष शिक्षणामुळे विद्यार्थी आपल्या जीवनात राेजगाराबराेबर एक उत्तम व्यक्ती हाेताे.
जगाला आधार मानताना
जेव्हा आपण जगाला आधार मानताे, तेव्हा हे बघण्याचा प्रयत्न करायला हवा, की जगातील काेणकाेणत्या देशातील शिक्षण विद्यार्थ्यांना त्या विशेष शिक्षणाच्या आधारे जीवनात उन्नती करण्यासाठी सहायक ठरते. एक उदाहरण बघू... आज भारतात इंजिनिअर्सची संख्या माेठी आहे. पण आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की, इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअर झालेल्या किती विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते? तर खूप कमी. यामुळे अशी मुलं स्वतःला कमी लेखायला सुरुवात करतात.
करिअरची निवड करत असताना त्या विद्यार्थ्याचं वय 17-18 असतं. ताे समाजाचे विचार आणि आई-वडिलांचं मत यांचा आदर करत करिअर निवडताे. पण आज स्थिती वेगळी आहे.आणखी एक उदाहरण बघू... कुक म्हणजे वेगवेगळे पदार्थ करणारा आज 20-30 हजार रुपये वार्षिक पॅकेजवर काम करत आहे. आता या कामाकडे आदरणीय प्राेेशनल म्हणून बघितले जात आहे. वयाच्या साधारण बावीस-तेवीसाव्या वर्षी हे विद्यार्थी छान सेटल हाेतात. पण आज किती आई-वडिलांना असे वाटते की, त्यांच्या मुलाने किंवा मुलीने कुक व्हावे? हे तर केवळ एक उदाहरण आहे, अशी अनेक प्राेेशन्स आहेत.शिक्षणाच्या बाबतीत उत्तम मानले जाणारे विकसित देश, भारतीय शिक्षणाच्या तुलनेत अधिक काय करतात? तर ते जीवनासाठी आवश्यक असणारं असं शिक्षण देतात. अर्थात भारतीय शिक्षण पद्धतीतही या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे...