तुळजापुरात चिमुकल्याने खाऊचे पैसे दिले मुख्यमंत्री निधीसाठी

27 Oct 2020 11:22:07

p0-_1  H x W: 0 
 
तुळजापूर, 26 ऑक्टाेबर (वि.प्र.) : ‘आदर्श, तू दिलेली ही प्रेमाची भेट आहे. यात या रकमेइतकीच भर घालून, ती मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल,’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांनी आदर्श जाधव या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबद जिल्हा दाैऱ्यात आदर्श जाधवने खाऊसाठी जमा केलेल्या रकमेचा डबा मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे साेपवला.त्यावेळी त्याचा मुख्यमंत्र्यांशी हा संवाद झाला. आदर्श साैदागर जाधव हा मंगळूर (ता. तुळजापूर) येथील चिमुकला. घरच्यांनी खाऊसाठी दिलेले पैसे त्याने एका डब्यात साठवले हाेते. हे पैसे त्याने वडील साैदागर जाधव यांच्यासाेबत जाऊन मुख्यमंत्र्यांकडे तुळजापूरच्या शासकीय विश्रामगृहात सुपूर्द केले. मुख्यमंत्र्यांनी आदर्शची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. आपत्कालीन परिस्थितीतही धीराने आणि परस्परांना सहाय्य करण्याच्या आदर्शच्या संवेदनशीलतेचे मुख्यमंत्र्यांनी काैतुक केले.
Powered By Sangraha 9.0