गूळ कसा तयार हाेताे हे तुम्हाला माहिती आहे का?

    27-Oct-2020
Total Views |

'[0_1  H x W: 0 
 
गूळ तयार हाेतांना पाहणे ही एक फार मजेदार गाेष्ट असते. ऊस, ताड, माड इ. वनस्पतींपासून मिळणारा रस उकळून थंड केल्यावर जाे घन पदार्थ तयार हाेताे त्याला गूळ म्हणतात. गुळाचा उपयाेग प्रामुख्याने अन्नपदार्थांना गाेडी आणण्याकरिता करण्यात येताे. उसापासून गूळ आणि साखर तयार करण्याची क्रिया भारतात प्राचीन काळापासून माहीत आहे. गुळाचे उत्पादन बहुतेक ठिकाणी वैयक्तिक गुऱ्हाळे उभारून आणि काही ठिकाणी सहकारी संस्थांमार्फत करण्यात येते. महाराष्ट्रात काेल्हापूर येथे तयार हाेणाऱ्या गुळाचा दर्जा सर्वांत चांगला मानण्यात येताे. या ठिकाणी चांगला गूळ तयार करणाऱ्यांची परंपराही आहे. गुळाची ढेप तुम्ही पाहिलीच असेल. या गुळाच्या ढेपा तयार करण्याकरिता पूर्वी जमिनीत ढेपांच्या आकाराचे खड्डे पाडून त्यांच्या बाजूला चिपाडे लावून ठेवीत. परंतु आता ढेपा पाडण्यासाठी लाकडी वा लाेखंडी भांडी किंवा बादल्याच वापरतात. ढेपाळ्यांना किंवा बादल्यांना खालून छिद्रे असतात व त्यातून घट्ट न झालेला भाग बाहेर निथळून जाताे. अर्धवट घट्ट झालेला गूळ बादलीत भरताना आतून ओलसर स्वच्छ फडके ठेवून मगच गूळ भरतात. ढेप घट्ट हाेण्यास साधारणपणे एक तास लागताे. मग पुढे ही ढेप दुकानांत येते आणि तिथून पुढे आपल्या घरी. गुळाच्या ढेपीची ही गाेष्ट तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की सांगा.