काेराेनाकाळात खिडक्या उघडा, विषाणूला पळवा

    27-Oct-2020
Total Views |
बीएमजे या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार घरामध्ये अथवा ऑफिसमध्ये हवा खेळती असेल, तर संसर्ग राेखला जाताे. दम्याच्या विषाणूंपासून 72 टक्के रक्षण मिळते.
 
g43e_1  H x W:
 
काेराेना विषाणूला पळवून लावण्यासाठी घराच्या खिडक्या बंद करून चालणार नाही, उलट घर, इमारती अन्य संकुलांच्या खिडक्या उघडायला हव्यात, असा सल्ला संशाेधकांनी दिला आहे. कारण बंद इमारतींमध्ये, घरांमध्ये काेराेनाचा विषाणू अधिक काळ टिकून राहताे, असे दिसून आले आहे.काेराेनाचे अगदी सूक्ष्म विषाणू हवेतच बराच वेळ राहतात. त्यामुळे जर घरांमध्ये, इमारतींमध्ये हवा खेळती राहिली, तर ते बाहेर जाऊ शकतात. घरात काेंडलेला धूर बाहेर काढायचा असेल, तर खिडक्या उघडाव्या लागतात, तशीच काहीशी पद्धतइथे वापरावी लागते.बीएमजे या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार घरामध्ये अथवा ऑफिसमध्ये हवा खेळती असेल, तर दम्याच्या विषाणूंपासून 72 टक्के रक्षण मिळते. विकसित देशांमध्ये महागड्या व्हेंटिलेशन सिस्टिम्स बसवणे परवडणारे नसते. त्यामुळे रुग्णालयांसारख्या ठिकाणीही खिडक्या उघड्या ठेवणे उपयुक्त ठरते.काेराेना विषाणूच्या पार्श्वभूमीवरही उघड्या खिडक्या फायदेशीर ठरतात. खिडक्या उघड्या ठेवल्या तर विषाणूचा संसर्ग राेखला जाताे. ताज्या, खेळत्या हवेमुळे विषाणूंचा फैलाव राेखला जाताे, असे अभ्यासातून दिसून आले आहे.