आयएनएस कवरत्ती नाैदलात दाखल

    27-Oct-2020
Total Views |

'[]_1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 26 ऑक्टाेबर (वि.प्र.) : देशी बनावटीची आयएनएस कवरत्ती युद्धनाैका नाैदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. ‘पाणबुड्यांची कर्दनकाळ’ अशी या युद्धनाैकेची ओळख आहे.प्राेजेक्ट- 28 अंतर्गत ही युद्धनाैका बनवण्यात आली असून, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी विशाखापट्टणममध्ये ही युद्धनाैका नाैदलाकडे सुपूर्द केली आहे. प्राेजेक्ट- 28 नुसार चार स्टील्थ युद्धनाैका बनवण्यात आल्या आहेत.यांपैकी तीन युद्धनाैका आधीच नाैदलात दाखल झाल्या आहेत. आयएनएस कवरत्ती ही या श्रेणीतील चाैथी युद्धनाैका आहे. मुख्य म्हणजे नाैदलाच्या अभियंत्यांनीच या युद्धनाैकेचा आराखडा बनवला आहे. या युद्धनाैकेवरील 90 टक्के उपकरणे देशी बनावटीची आहेत.पाणबुड्यांचा शाेध घेणे आणि त्यांच्यावर अचूक हल्ला करण्यासाठी ही युद्धनाैका सक्षम आहे. पाणबुड्यांची शाेधमाेहीम सुरु असतानाच स्वत:चा बचाव करणे आणि लांब पल्ल्याच्या माेहिमा यशस्वीरीत्या पूर्ण करणे, ही तिची खासियत असेल.