वृषभ

    25-Oct-2020
Total Views |
या आठवड्यात मित्र व वडीलधाऱ्यांकडून मदत मिळण्याचे शुभसंकेत आहेत.पहिला दिवस खर्चिक राहील व विनाकारण प्रवासात वेळ जाईल. व्यवसायात अपेक्षित लाभ हाेईल. प्रतिस्पर्धी, वरिष्ठ व कायदेशीर डावपेचांमुळे आपल्या कामाला उशीर हाेऊ शकताे. या काळात भावा-बहिणींसाेबत वेळ घालवाल.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात व्यवसायात तुम्ही संथ पण स्थिरपणे पुढे जात राहाल. यावेळी नवी सुरुवात वा काेणत्याही माेठ्या बदलाच्या परिणामाची अपेक्षा बाळगू नये. शक्यतो या काळात काेणताही नवा उद्याेग करण्याचा प्रयत्न करू नये. नाेकरीतही बढती व नव्या संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
 
नातीगाेती : सध्या प्रेमसंबंधाच्या तुलनेत व्यावसायिक संबंधांकडे जास्त लक्ष द्याल. कार्यस्थळावर विरुद्धलिंगी जातकांकडे आकर्षित हाेणे नाकारू शकत नाही. या आठवड्यात तुम्ही लाेकांशी संपर्क साधण्यावर जास्त भर द्याल.व्यवस्थित बाेलण्यामुळे तुम्ही प्रेमाच्या व इतर संबंधात यशही मिळवू शकता.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्यात सतत चढउतार हाेत राहील. हा आठवडा तुम्ही चांगल्या प्रकारे घालवू शकाल. जर तुम्ही खाण्या-पिण्याकडे आणि पुरेशा विश्रांतीकडे लक्ष दिले नाही तर तुमची तब्बेत बिघडू शकते. त्यामुळे याबाबत दक्षता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
 
शुभदिनांक : 25, 29, 30
 
शुभरंग : हिरवा, गुलाबी, पिवळा
 
शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात कुटुंबीय तुमच्या बाेलण्यामुळे विराेधात जाऊ शकतात. काही गुप्त शत्रू तुमचे नुकसान करू शकतात.
 
उपाय : पहाटे उठून तुळशीची माळ बनवून श्रीमहालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी. धनलाभ हाेईल.