वृश्चिक

25 Oct 2020 16:20:12
या आठवड्यात तुमच्या यश, मान, प्रतिष्ठेत वाढ हाेईल. तुमच्या जाेडीदाराकडून फायदा हाेईल. जाेडीदार वा प्रिय व्यक्तीसाेबत फिरण्याचा व हाॅटेलिंगचा याेगही जुळून येईल. पण तुम्हाला तुमच्या रागावर व नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवायला हवे.
धार्मिक प्रवास घडू शकताे.
 
नाेकरी/व्यवसाय : धंद्यात विराेधक व शत्रुंविरुद्ध लढण्यासाठी कंबर कसून तयार राहायला हवे. तुमच्या प्रगतीचे याेग प्रबळ आहेत. पण थाेडासा बेसावधपणा एखाद्या माेठ्या चिंतेचे कारण बनू शकते. शेअर बाजारातील जातकांसाठी हा आठवडा खूपच चांगला असेल.
 
नातीगाेती : आठवड्याच्या मध्यात तुमच्या प्रेमसंबधात थाेडीशी नीरसता येऊ शकते. तुमच्या व्यावसायिक व्यस्ततेला यासाठी दाेषी धरले जाऊ शकते.आठवड्याच्या सुरुवातीला वैवाहिक जीवनाचा आनंद लुटू शकता. तुमच्या मनात विरक्तीच्या भावनेचा प्रादुर्भाव हाेऊ शकताे. संततीसुखासाठी अनुकूल काळ आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्यासंबंधित काेणतीही माेठी समस्या हाेण्याची श्नयता नाही. नियमित व्यायाम, ध्यान व खाण्या-पिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवायला हवे. शारीरिक रुपात सुदृढ राहाल. आराेग्यासंबंधित काेणतीही किरकाेळ समस्याही बेपर्वाईमुळे माेठी हाेऊ शकते.
 
शुभदिनांक : 26, 28, 31
 
शुभरंग : ग्रे, पिवळा, लाल
 
शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक हाेऊ शकते. डाेळे झाकून काेणावरही विश्वास ठेवू नये.
 
उपाय : काळे तीळ आणि कापसाची वात टाकून सरसू तेलाचा दिवा लावा व शमीच्या राेपासमाेर शनिमंत्र म्हणा. शनीचा दुष्प्रभाव कमी हाेईल.
Powered By Sangraha 9.0