तूळ

    25-Oct-2020
Total Views |
हा आठवडा नाेकरी व उत्पन्नासाठी शुभ फलदायी असेल. तुम्हाला पडण्यापासून व वाहनापासून जपायला हवे. घाईगडबडीने नुकसान संभवते. राग, आवेश व निराशा टाळा. सासरशी संबंधात सध्या थाेडा मतभेद वाढेल. नाेकरीत परदेशी जाण्याचा प्रस्ताव येऊ शकताे. सर्व प्रकारचे लाभ मिळत राहतील.
 
नाेकरी/व्यवसाय : व्यवसायात नियाेजनाशिवाय पुढे जाऊ नये. घाईत काेणताही निर्णय घेणे टाळावे. श्नयताे शेती, स्थावर मालमत्ता, वाहन, मशिनरी कारभारात काेणतीही नवी खरेदी करू नये. शेअर व सट्टा बाजारापासून लांब राहावे.विदेशाच्या कामात दिरंगाई हाेईल तर स्थानिक कामे लवकर पार पडतील.
 
नातीगाेती : तुमच्या मनात आसक्ती व उत्कंठा दाेन्हीही असेल. विनाकारण प्रवास हाेण्याची शक्यता निर्माण हाेऊ शकते. तुम्ही एखाद्याकडून फसवले जाण्याचीही श्नयता आहे. इतरांशी बाेलताना तुम्ही शब्दांवर ताबा ठेवावा.
 
आराेग्य : आराेग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला असेल. तरीही आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही विशेष दक्षता बाळगायला हवी. माेसमी आजारांच्या तावडीत सापडू शकता. त्वचाविकार, सर्दी-पडसे, खाेकला असल्यास त्यावर उपचार करण्यात दिरंगाई करू नये. थकवा जाणवत राहील.
 
शुभदिनांक : 26, 27, 30
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : एखाद्या वादविवादापायी व हानीपायी पैसा जास्त खर्च हाेऊ शकताे.
 
उपाय : लक्ष्मीच्या फाेटाेसमाेर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावून कमळगट्ट्यांच्या माळेने ‘ॐ एं ऱ्हीं श्रीं क्लीं दारिद्र्य विनाशके जगत्मासूत्यै नम:’या मंत्राचा जप केल्यामुळे लक्ष्मीदेवी प्रसन्न हाेईल. ही क्रिया राेज केल्यास लक्ष्मीचा वास स्थिर हाेईल.