ओळख थाेरांची : नेल्सन मंडेला

    25-Oct-2020
Total Views |

nm90_1  H x W:
 
नेल्सन मंडेला यांनी साम्राज्यवाद, गरिबी आणि वंशभेदाचं उच्चाटन करण्यासाठी जाे अतुलनीय लढा दिला त्यामुळे ते कायम प्रेरणादायी ठरतात. 18 जुलै 1918 राेजी त्यांचा जन्म झाला. मंडेला यांचा बालपणापासूनचा काळ, शिक्षण, वकिलीतील संघर्ष, राेबेन बेटावरील काेठडी आणि स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतचा कालखंड त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिकूल हाेता. कितीही कठीण परिस्थिती आली तरीदेखील आयुष्यभर आदर्श जीवनमूल्यं जपणारे मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. नेल्सन मंडेला ह्यांना लाेकशाहीसाठी आणि मानवी मूल्यांसाठी 27 वर्षे कारावास भाेगावा लागला. परंतु ते खचून गेले नाहीत. मंडेलांचे प्रत्येक पाऊल हे दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याकडे, स्वयंशासनाकडे, लाेकशाहीकडे नेणारे हाेते. 1993 साली वर्णभेदामुळे निर्माण झालेला अविश्वास दूर करुन, दक्षिण आफ्रिकेत लाेकशाही रुजवण्याच्या प्रयत्नांबद्दल आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते नेल्सन मंडेला आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष एफ. डब्ल्यू. डी.क्लर्क यांना शांततेसाठीचा नाेबेल पुरस्कार देण्यात आला. नेल्सन मंडेला ह्यांच्यावर महात्मा गांधी ह्यांच्या अहिंसा चळवळीचा खाेलवर परिणाम झालेला हाेता. ते गांधींना आदर्श मानत असत.नेल्सन मंडेला ह्यांचे आत्तुमचरित्म्हीर नक्की वाचा.