मिथुन

    25-Oct-2020
Total Views |
हा आठवडा व्यावसायिक व आर्थिक दृष्ट्या शुभ ठरेल. आठवड्याचा पूर्वार्ध काहीसा खर्चिक राहणार आहे. काेणत्या ना काेणत्या प्रकारे फायदा हाेईल.राग व आततायीपणामुळे तुमचे काम बिघडू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही आनंदाने व उत्साहाने काम कराल. काैटुंबिक क्लेश टाळण्याचा प्रयत्न करा.
 
नाेकरी/व्यवसाय : आठवड्याची सुरुवात चांगली राहील. एखाद्या विद्वान व समाजातील प्रभावी व्यक्तीशी भेट हाेईल. तयाच्या मदतीने व्यापारात लाभ हाेईल. नाेकरदारांवर वरिष्ठांची कृपा राहील. संपर्क व संचारावर आधारित कामकाजात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी फायदा हाेईल.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही प्रेमाने बाेलून नात्यात पारदर्शकता राखाल तर ते जास्त चांगले ठरेल. मित्र व भावंडांशी माेठ्या वादात पडू नये.त्यांच्याकडून सध्या काेणतीही आशा बाळगू नये. प्रारंभी विरुद्धलिंगी आकर्षण कमी राहील.
 
आराेग्य : या आठवड्यात प्रेमसंबधात थाेडी अनुकूलता असेल. पण संबंध पुढे वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी आठवड्याचा उत्तरार्ध जास्त चांगला असेल.भावंडांशी व मित्रांशी संबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पूर्वार्धात विनाकारण रागापायी दांपत्यसंबंध बिघडू शकतात.
 
शुभदिनांक : 25, 29, 30
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात कार्यस्थळी राजकारणामुळे प्रतिस्पर्धी आपल्याला पुढे करतील. काही गुप्तशत्रू नुकसान करू शकतात.
 
उपाय : पिंपळाचे मूळ, उंबराचे मूळ, दुर्वा व गवताचे मूळ एका चांदीच्या डबीत ठेवून राेज पूजा करा. जीवनात कधीही अपयश येणार नाही.