मीन

25 Oct 2020 16:07:15
या आठवड्यात उत्तम लाभ हाेऊ शकताे. नाेकरीत वरिष्ठांकडून भरपूर सहकार्य लाभेल. ज्या व्यक्ती तुमचे अहित करण्याचा प्रयत्न करीत हाेते त्यांचा पाडाव हाेईल.अविवाहितांसाठी विवाहाचा उत्तम प्रस्ताव येईल. शिक्षण, साहित्य, लेखनाच्या क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम लाभ हाेऊ शकताे.
 
नाेकरी/व्यवसाय : या आठवड्यात सरकारी नाेकर व सरकारी कामे करणाऱ्यांना अत्याधिक यश मिळू शकेल. सेल्स व मार्केटिंग कामातील जातकांसाठी पहिला दिवस लाभदायक ठरणार आहे. भाग्य तुमच्यासाेबत नसल्यामुळे कामाचे फळ कमी वा नगण्य मिळेल. नाेकरदार प्रतिस्पर्धकांचा पराभव करू शकतात.
 
नातीगाेती : तुम्ही आवेशात राहाल. यासाठी प्रेमात तुम्हाला वागण्या-बाेलण्यावर ताबा ठेवावा लागेल. वाद वा मतभेद टाळाल तरच दांपत्यजीवन सुखद हाेईल. प्रेमसंबंध सामान्य राहतील. विरुद्धलिंगी व्यक्तींचे आकर्षण कमी असेल.
 
आराेग्य : हा आठवडा तुम्हाला काेणत्या ना काेणत्या आजाराकडे ढकलू शकताे.स्थूलता, मधुमेह, रक्तदाब, जीभ वा घशासंबंधित त्रास अस्वस्थपणा, तणाव इ.समस्या निर्माण हाेऊ शकतात. त्या दृष्टीने आपण स्वत:ला जपायला हवे.
 
शुभदिनांक : 26, 28, 31
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून फसवणूक हाेऊ शकते. डाेळे झाकून काेणावरही विश्वास ठेवू नये.
 
उपाय : तूप, मध, साखर, बदामाचे तेलाने महामृत्यूंजय मंत्राचा जप करीत अभिषेक करावा. त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घातल्यानंतर केशराचा टिळा लावावा. आणि ‘ॐ शं शनैश्वराय नम:’ मंत्राचा 108 वेळा जप करीतत सरसू तेलाचा अभिषेक करावा.
Powered By Sangraha 9.0