मकर

25 Oct 2020 16:17:32
या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही जास्त भावुक असाल. त्यामुळे जवळच्या व्यक्तींचा जास्त विचार कराल. तसेच त्यांच्यासाठी खर्चही कराल. भावा- बहिणींच्या संबंधात थाेडा तणाव उत्पन्न हाेऊ शकताे. त्यांच्यावर तुमचे विचार लादण्याचा व त्यांना स्वत:च्या ताब्यात ठेवण्याचा विचार कराल.
 
नाेकरी/व्यवसाय : व्यावसायिक विकासाचा वेग थाेडा मंदावू शकताे.नाेकरदारांसाठी किरकाेळ काम करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच लाभदायक ठरणार आहे. तुम्ही शेअरबाजारात नियाेजनपूर्वक गुंतवणूक करून उत्तम लाभ कमवू शकता. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या लाेकांना लाभ हाेईल.
 
नातीगाेती : तुम्ही कुटुंबाबाबतच्या गाेष्टींमध्ये जास्तच भावुक असाल. तुम्ही वाणी व व्यवहारद्वारे विरुद्धलिंगी जातकाला प्रभावित करू शकता.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आराेग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्या अष्टमस्थानी वक्री गुरू आणि राहूची युती आराेग्याबाबत समस्या निर्माण करू शकते. शरीराला मार लागून रक्तस्राव हाेऊ शकताे. स्थूलता, मधुमेह वा एखादा जुना आजार डाेके वर काढू शकताे.
 
शुभदिनांक : 25, 29, 30
 
शुभरंग : निळा, काळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात शत्रू कुरघाेडी करू शकताे. घरात विचारपूर्वक बाेला.व विनाकारण वाद हाेणार नाही याची काळजी घ्या.
उपाय : महालक्ष्मीच्या चित्रासमाेर तुपाचा दिवा, 3 लवंगा टाकून लावा.
 
नैवेद्यात खीर वा शिरा ठेवा. तुळशीला पाणी घाला व ‘ॐ नमाे महालक्ष्मै नम:’ मंत्राचा जप करा. लक्ष्मी प्रसन्न हाेईल व घरात वास करील.
Powered By Sangraha 9.0