कुंभ

25 Oct 2020 16:16:25
या आठवड्यात नवीन कामाचे पूर्वनियाेजन करू शकाल, पण ते अमलात आणण्यास थाेडी वाट पाहावी लागेल. धाकटी भावंडे तुमच्या प्रत्येक कामात मदत करण्याचा प्रयत्न करतील. प्रकाशन, फाेटाेग्राफी करणाऱ्यांना सध्या मंदी असेल. काेणत्याही कामात धीर धरायला हवा. आईच्या तब्बेतीची काळजी घ्यावी लागेल.
 
नाेकरी/व्यवसाय : व्यवसायासंबंधित कामे सध्या संथपणे चालू राहतील.शक्यतो या दरम्यान काेणताही नवा निर्णय घेऊ नये वा नवे काम करू नये. लाेखंड, शेती, स्थावर मालमत्ता संबंधित उत्पादने, लाल रंगाच्या वस्तू, धातू, इले्नट्राॅन्निस, वाहनसंबंधित कामातील लाेकांना जास्त मंदीचा सामना करावा लागू शकताे.
 
नातीगाेती : जीवनात नाती मनापासून समजण्याची व प्रेम करण्याची गरज असते. तसेच शरीरसंबंधही जीवनाचे अविभाज्य अंग आहे. एक सुदृढ वैवाहिक नाते मजबूत करण्यासाठी ते आवश्यक असते. तुम्ही एखाद्या आव्हानाशी झुंजत असाल तर बिनदिक्कत तुमच्या जाेडीदाराला सांगून ते संपवू शकता.
 
आराेग्य : तुम्हाला असलेल्या मानसिक अस्वस्थतेमुळे तुमच्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला हवे. ज्या व्यक्ती घसा, गाल, त्वचा, प्रजनन अवयव वा रक्तवाहिन्यांसंबधित आजाराने पीडित असतील त्यांनी आपल्या उपचारात दक्षता बाळगायला हवी.
 
शुभदिनांक : 28, 29, 30
 
शुभरंग : गुलाबी, ग्रे, लाल
 
शुभवार : साेमवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : पैसा अडकून राहण्याची शक्यता आहे. जाेखमीचे काम करू नये.
 
उपाय : शिवलिंगावर कच्च्या दूधात केशर व तीर्थजल मिसळून अभिषेक करावा.स्नानानंतर केशर व हळदीचा टिळा लावावा. पिवळे फूल व नागकेशरसाेबत केशर तंतूही अर्पण करावा.
Powered By Sangraha 9.0