कर्क

25 Oct 2020 16:28:32
हा आठवडा काेणत्याही कामासाठी अनुकूल राहील. तुम्ही व्यावसायिक व खासगी जीवनात संतुलन राखाल. आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवसाय विस्ताराचा विचार कराल. तुम्ही गुंतवणुकीच्या याेजना तयार करीत असाल तर सध्याचा काळ अनुकूल आहे. मानसिक चंचलतेवर नियंत्रण ठेवून पुढे व्हा.
 
नाेकरी/व्यवसाय : व्यावसायिक आघाडीवर तुमची सुरुवात खूपच बेकार हाेण्याचे संकेत मिळत आहेत. धंद्यात एखादा खर्च वाढू शकताे. शेअर बाजार व सट्टा बाजारापासून दूर राहावे. राेजच्या कामातील अपयशामुळे कामात बदल वा नाेकरीत बदल करावासा वाटू शकताे.
 
नातीगाेती : प्रेमात तुम्ही खूपच संथपणे पुढे जाल. तुमची मनपसंत व्यक्ती तुमच्या जवळ असूनही तुम्ही प्रेम व्यक्त करू शकणार नाही. तुमच्या बाेलण्यात अहंकार व स्वभावात रागीटपणा राहण्याची श्नयता आहे. प्रेमसंबंधात पुढे जाण्याच्या वा काेणताही नवा संबंध सुरू करण्यासाठी हा आठवडा ठीक आहे..
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्हाला तुमच्या तब्बेतीकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या शारीरिक दुखण्याचे व्यवस्थित निदान हाेऊ शकते.
ज्यांना पाठीच्या कण्याचा, हृदय, रक्तवाहिन्यासंबंधित त्रास असेल त्यांनी विशेष लक्ष द्यायला हवे. जीभ, घशाचा त्रास, ताेंडात व्रण इ.ची शक्यता आहे..
 
शुभदिनांक : 26, 28, 31
 
शुभरंग : गुलाबी, पांढरा, लाल
 
शुभवार : साेमवार, बुधवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात वरिष्ठांशी संबंध चांगले हाेतील पण सहकाऱ्यांशी मतभेद व वाद हाेऊ शकताे. शत्रूपक्ष डाेके वर काढू शकताे.
 
उपाय : सकाळी सर्वप्रथम काळे उडीद व चमकदार काळे वस्त्र एखाद्याला दान द्यावे वा शनी मंदिरात गुपचूपपणे ठेवून यावे. ग्रहदाेष नाहीसे हाेतील
Powered By Sangraha 9.0