धनु

    25-Oct-2020
Total Views |
प्राॅपर्टीसंबंधित शुभफळ लाभेल. नवे वाहन घेऊ शकाल. घराच्या व्यवहारासाठी शुभकाळ आहे, पण सध्या नाेकरचाकरांचे सुख कमी मिळेल. तुमच्या हाताखालील माणसे तुमच्या मनाजाेगे काम करतील. वैवाहिक जीवनातील मतभेद दूर हाेतील.
व्यापारातील भागिदारासाेबतचे मतभेदही दूर हाेतील.
 
नाेकरी/व्यवसाय : व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही जपानी माेनाेरेल प्रमाणे मंदपणे पण स्थिर गतीने पुढे जात राहाल. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या मार्गात अडचणी आणतील. सहकर्मचाऱ्यांकडून मनाजाेगी मदत न मिळाल्यामुळे मानसिक अशांती राहील. नाेकरदारांनी सध्याच्या नाेकरीतच राहावे.
 
नातीगाेती : प्रेमसंबंधासाठी हा आठवडा शुभ आहे. भेटीगाठी वा आपल्या आवडत्या व्यक्तीसमाेर प्रेमाचा प्रस्ताव ठेवण्यासाठी हा आठवडा सर्वथा अनुकूल आहे.दांपत्यजीवनात जवळीक वाढेल. पती-पत्नी एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करतील. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी तुम्ही जास्त धार्मिक राहाल.
 
आराेग्य : या आठवड्यात आराेग्याबाबत तुम्हाला थाेडासा दिलासा मिळेल.तुमच्यात मानसिक व्यग्रता जास्त राहील. जाेखमीच्या कामात, वाहन चालवताना वा अविवेकी काम करताना तुम्ही जखमी हाेऊ शकता. खेळातील जातकांनी जरा सावध राहणे गरजेचे आहे.
 
शुभदिनांक : 25, 28,30
 
शुभरंग : गुलाबी, पिवळा, लाल
 
शुभवार : साेमवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात एखाद्याला पैसे उसने देत असाल तर त्याच्याकडून परत मिळण्याची आशा बाळगू नये.
 
उपाय : या आठवड्यात अशाेक वृक्षाचे मूळ अशाेक वृक्षाला मागून आणा व स्वत:जवळ ठेवा. धन स्थिर राहील.