काेराेना काळात लठ्ठपणा, काेलेस्टेराॅल, मधुमेह आणि बीपी यामुळे जास्त मृत्य

    25-Oct-2020
Total Views |

./'[_1  H x W:  
 
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (वि.प्र.): काेराेना काळात उच्च र्नतदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि काेलेस्टेराॅल हे चार आजार काळच ठरले. कारण लाेकांचे काेराेनापेक्षा याच आजारांनी माेठ्या संख्येत मृत्यू झाल्याचे 204 देशांत अध्ययन करून 5,500 वैज्ञानिकांनी काढलेला हा निष्कर्ष आहे. या आजारांनी गेल्या 5-6 महिन्यांत 10 लाखांपेक्षा जास्त लाेकांचा मृत्यू झाला. कारण हे चार आजार असलेल्या लाेकांना काेराेनाची लवकर बाधा झाली.यावर जीवनशैली बदलणे हाच सर्वाेत्तम उपाय असल्याचे मत या वैज्ञानिकांनी व्य्नत केले आहे.काेराेनाचा प्रादुर्भाव हाेण्यापूर्वीच या चार आजारांचे प्रमाण जगभर वाढू लागले हाेते. पण सार्वजनिक आराेग्य यंत्रणा या आजारांवर उपचार करण्यात अपयशी ठरली.त्यामुळे काेराेनाचा प्रादुर्भाव हाेताच काेराेनामुळे कमी परंतु या आजाराने मरण पावणाऱ्या लाेकांची संख्या जास्त हाेती.अशी माहिती लांन्सेटचे संपादक रिचर्ड हाॅर्टन यांनी नवी दिल्लीत बाेलताना दिली. या चार आजारांमुळे काेराेना जास्त खतरनाक झाला.जीवनशैलीत देशाच्या हवामानाला अनुकूल बदल केला नाही, तर काेराेना संपुष्टात येणे अवघड असल्याचे मत रिचर्ड हाॅर्टन यांनी व्य्नत केले. ते ‘द लान्सेट’ चे संपादक आहेत. लाेकांनी आपले खानपान आपापल्या देशाच्या हवामानाशी अनुकूल ठेवावे. काेराेना काळात हृदयविकार असलेल्या लाेकांचा माेठ्या संख्येने मृत्यू झाला. विशेष म्हणजे तरुणांना पाठीच्या खालच्या भागात वेदना हाेऊन माेठ्या संख्येने तरुणांचाही मृत्यू झाल्याचे या पाहणीत आढळून आले.
2019 मध्ये 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा मृत्यू हाेण्याचे कारण श्वासाचा त्रास, डायरिया, मलेरिया, मॅनिंजायटिस आणि खाेकला हे हाेते, तर 10 ते 49 वर्षांच्या वयाेगटातील लाेकांच्या माेठ्या संख्येने मृत्यू हाेण्याचे कारण जखम, एडस्, पाठीच्या वेदना आणि मानसिक ताणाशी संलग्न आजार हाेते. 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाेकांच्या मृत्यूचे कारण इल्केमिक हृदय विकार, हार्टस्ट्राेक आणि मधुमेह हे हाेते. असेही या पाहणीत आढळून आल्याचे रिचर्ड हाॅर्टन यांनी सांगितले.