एसआरए विकसकाने 8 महिने उलटूनही भाडे भरले नाही

    25-Oct-2020
Total Views |
भाडे न भरल्यास महापालिका सदनिका ताब्यात घेणार
 
,.lo_1  H x W:
 
पुणे, 24 ऑक्टोबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क, पुणे)- घाेरपडे पेठेतील इनामके मळ्यातील एसआरए ट्रान्झीट कॅम्पमधील सदनिका वापरणाऱ्या एसआरए विकसकाने 9 महिने हाेऊनही महापालिकेचे भाडे भरले नसल्याचे समाेर आले. विशेष असे की, विकसकाच्या ताब्यात असलेल्या वडगाव बुद्रुक येथील 60 सदनिकांचेही भाडे थकले आहे. एकीकडे महापालिका उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे ठराविक विकसकांवर मेहेरनजर दाखवत असल्याचे समाेर आले आहे.लाेहियानगर येथील झाेपडपट्टीचे एसआरएअंतर्गत पुनर्वसन करण्यात येत आहे. हे काम टारगेट इन्फ्रा डेव्हलपर्स करत आहेत. या झाेपडपट्टीतील नागरिकांचे इनामके मळा येथील ट्रान्झीट कॅम्पमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे, परंतु हे स्थलांतर करताना क्षेत्रीय कार्यालयाला हाताशी धरून साधारण चार वर्षे कमी भाडेदरामध्ये महापालिकेच्या ट्रान्झीट कॅम्पमधील इमारतीतील सदनिका घेण्यात आल्या हाेत्या. याबाबतच्या करारातही नियमांचे उल्लंघन झाले आहे. असे असताना प्रशासनाने यावर्षी सुरुवातीला विकसकाच्या मागणीनुसार आणि एसआरए याेजनेचे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांचा विचार करून रीतसर मुदतवाढ दिली आहे.सर्वसाधारण सभेतही याला मान्यता देण्यात आली. नव्याने करार करताना महापालिकेने एसआरएच्या तत्कालीन दरानुसार प्रत्येक सदनिकेसाठी 2 हजार 200 रुपये भाडेदर आकारला आहे, परंतु हा करार झाल्यानंतर भाड्याची रक्कम आगाऊ भरणे बंधनकारक केले आहे. मात्र, आजतागायत ही रक्कम महापालिकेला भरली नसल्याचे समाेर आले आहे. विशेष असे की, याच विकसकाने वडगाव बु. येथील प्रयेजा सिटी ट्रान्झीट कॅम्पमधील 60 सदनिका भाड्याने घेतल्या आहेत. त्याचेही भाडे थकविल्याने नुकतेच महापालिकेने नाेटीस बजावली आहे.या नाेटिशीनुसार आज ही रक्कम भरणे अपेक्षित असतानाही ही रक्कम भरली नसल्याचे निदर्शनास आले. संबंधित विकसकावर व त्यांना सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी लाेहियानगर न्याय हक्क कृती समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.