तुम्ही रवींद्र संगीत ऐकले आहे का?

    24-Oct-2020
Total Views |
 
m,./'_1  H x W:
 
भारतातील महान साहित्यिक रवींद्रनाथ टागाेर तुम्हाला माहिती असतीलच. त्यांना साहित्याचे ‘नाेबेल’ देखील मिळाले हाेते. त्यांचे ‘गीतांजली’ हे काव्य अजरामर झालेले आहे. त्यांच्या सर्व साहित्यकृती, नाटके, त्यांचे विचार आजही प्रेरणा देतात. त्यांचे साहित्य तुम्ही माेठे झाल्यावर नक्की वाचा. परंतु आता एक गाेष्ट तुम्ही नक्कीच करू शकता आणि ते म्हणजे अतिशय मधुर असे रवींद्र संगीत ऐकणे. रवींद्रनाथ टागाेरांनी तयार केलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण संगीतप्रकार. भारतात एकाेणिसाव्या आणि विसाव्या शतकांत जी कलात्मक-सांस्कृतिक क्रांती झाली, त्याचे बरेचसे श्रेय गुरुदेव रवींद्रनाथ टागाेर यांच्याकडे जाते. त्यांनी जवळजवळ तीन हजार गाणी लिहिली आणि ती स्वरबद्धही केली. कवी आणि संगीतकार यांचा सुरेख संगम त्यांच्या व्य्नितमत्त्वात दिसून येताे.रवींद्रनाथांची हीच गीते पुढे ‘रवींद्र संगीत’ या नावाने प्रसिद्धी पावली. लहानपणी काही काळ त्यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास केला. त्यांच्या घरी नेहमी संगीताच्या बैठकी हाेत असत. याचा प्रभाव त्यांच्या बालमनावर झाला. शास्त्रीय संगीताप्रमाणेच त्यांनी लहानपणी बंगालची लाेकगीतेही खूप ऐकली हाेती. पद्मा नदीवर नाव चालविण्याऱ्या काेळी लाेकांची भटियाली गीते, गावाेगावी भ्रमंती करणाऱ्या संन्यासी लाेकांची बाउल गीते, तसेच राधा-कृष्णाच्या रूपलीला वर्णनांची भजने, कीर्तने या सर्वांचे उत्कट संस्कार त्यांच्यावर झाले. तुम्ही हे संगीत नक्की ऐका.