आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणाऱ्यांची संख्या वाढली

    24-Oct-2020
Total Views |

m,,./_1  H x W: 
 
तुमचं आराेग्य चांगलं राहण्यासाठी याेग्य आहार आवश्यक आहे. काेणता आहार याेग्य आणि काेणता आहार काेणत्या आजाराच्या समस्येचे कारण बनू शकतं हे माहीत असणं खूप आवश्यक आहे. आजच्या काळात लाेक आराेग्याविषयी जागरूक झाले आहेत.
त्यामुळे आहाराविषयी ते खूप विचार करू लागले आहेत, काेणता आहार आपल्यासाठी चांगला आहे, याची माहिती करून त्यानुसार आहार घेणाऱ्यांचं प्रमाण आता वाढलं आहे. काेणता आहार चांगला आणि ताे काेणत्या वेळेत घ्यावा याची माहिती करून घेण्यासाठी आहारतज्ज्ञाचा (डाएटिशिअनचा) सल्ला घेऊ लागले आहेत.तसेच रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांच्या आराेग्याची याेग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी त्यांच्या औषधांसाेबतच त्याच्या आहाराकडेही लक्ष दिले जाते. त्या रुग्णाचा आहार काय आणि कसा असावा याची आखणी करून त्याला तसा आहार दिला जाताे. हा आहार ठरवण्याचं काम आहारतज्ज्ञ करीत असतात.रुग्णालये, संस्था किंवा इतर काेणत्याही ठिकाणी तिथल्या लाेकांची याेग्य प्रकारे काळजी घेण्यासाठी त्यांच्या आहाराच्या याेजना आखणे, त्याविषयी वेळाेवेळी सूचना देणे, आहाराविषयीचे महत्त्व पटवून देणे ही कामे आहारतज्ज्ञाला करावी लागतात. रुग्णालयात रुग्णाने काेणता आहार घ्यावा हे आहारतज्ज्ञच ठरवतात.अन्नपदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जाते, ते ठिकाण आराेग्यदृष्ट्या याेग्य आहे किंवा नाही, अन्न तयार करताना याेग्य ती काळजी घेतली जाते की नाही, याची खात्री करून नंतरच पदार्थ तयार केले जातात. हे सगळं आहारतज्ज्ञच बघत असतात.या विषयीचं रीतसर प्रशिक्षण घेऊन तुम्ही या क्षेत्रात येऊ शकता. यात नाेकरीच्या भरपूर संधी आहेत. रुग्णालये, विविध संस्था यात तुम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध असते.याशिवाय तुम्ही किमान स्वत:चे आणि तुमच्या कुटुंबाचे आहारतज्ज्ञ तर बनू शकता.