पळून जायला निघाला आणि असा फसला...

24 Oct 2020 13:21:59
 
m,./_1  H x W:  
ब्राझीलमधील एका तुरुंगातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला एक कैदी दारातच अडकला. या सगळ्या घटनेची माहिती नुकतीच साेशल मीडियावर व्हायरल झाली.ब्राझीलमधील बॅल्नेआरिओ पिकारस या गावातील एका तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न एका 18 वर्षांच्या कैद्याने केला.ब्राझीलमधील जीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित कैदी दार फाेडण्याचा प्रयत्न करत हाेता, पण ते अर्धवट तुटले आणि त्या तुटलेल्या छिद्रातून त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा पार्श्वभाग मधे हवेतच तरंगू लागला.
त्याला साेडवण्यासाठी किमान तीन तास लागले. या सगळ्या घटनेचे व्हिडीओ फुटेजही उपलब्ध झाले आहे. अखेरीस कैद्याला साेडवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दार ताेडण्यासाठी त्याने एका हायड्राॅलिक साधनाचा उपयाेग केला आणि अखेरीस कैद्याची सुटका करण्यात आली.विशेष म्हणजे, संबंधित कैद्याला काेठडीत ठेवून दाेन तासही झालेले नव्हते.
तेवढ्या काळातच त्याने तुरुंग फाेडण्याचा प्रयत्न केला.
Powered By Sangraha 9.0