सगळ्या जगाची वेळ निश्चित करणारे ग्रिनीच रेखावृत्त

23 Oct 2020 11:11:53

m,o_1  H x W: 0
 
लंडनच्या ग्रीनविच बराेमधील राॅयल ऑब्झर्व्हेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाणवेळ आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (00 रेखांश) लंडनच्या ग्रिनविच ह्या उपनगरामधून जात असल्याचे गृहीत धरले असल्याने ग्रिनीच प्रमाणवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यूटीसी (युनिव्हर्सल टाईम काेऑर्डिनेटेड) या जागतिक प्रमाणवेळेसाठी ग्रिनीच येथील स्थानिक वेळ ही आधारभूत धरली जाते. युनायटेड किंग्डममध्ये ग्रिनीच वेळ हीच स्थानिक वेळ म्हणून वापरली जाते. पृथ्वीवर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना जाेडणाऱ्या उभ्या अर्धवर्तुळाकार अशा 360 रेषा कल्पिलेल्या आहेत. ज्यांना रेखावृत्त असे संबाेधले जाते. लंडनजवळील ग्रिनीच शहरावरून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त (00) मानले जाते. या रेखावृत्ताच्या अगदी विरुद्ध दिशेला 1800 रेखावृत्त असून, ही दाेन्ही रेखावृत्ते मिळून उभी वर्तुळाकार रेषा तयार हाेते, या रेषेमुळे पृथ्वीचे पूर्व गाेलार्ध व पश्चिम गाेलार्ध असे दाेन भाग पडतात.
 
Powered By Sangraha 9.0