शहीद पाेलिसांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

    23-Oct-2020
Total Views |
 
b._1  H x W: 0
 
मुंबई, 22 ऑक्टाेबर (आ.प्र.) : देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पाेलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नायगाव पाेलिस मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या निमित्ताने पाेलिस स्मृतिदिन संचलन समारंभही पार पडला. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई उपस्थित हाेते. विविध पाेलिस दलांतील 26 पाेलिस अधिकारी आणि 240 पाेलिस अंमलदारांनी देशासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. या वीरश्रेष्ठांच्या पवित्र स्मृतींना आपण विनम्र अभिवादन करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.