आराेग्य समस्यांवर परिणामकारक वाटाणे

    23-Oct-2020
Total Views |
 
म,._1  H x W: 0
 
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर (वि.प्र.): जगातील सर्वप्रकारच्या आहार समस्या, ऋतुमान आणि आराेग्याच्या समस्यांवर एकमेव उपाय म्हणजे वाटाणे असल्याचा आता शास्त्रज्ञांना उलगडा झाला आहे. भारतात माेठ्या प्रमाणावर वाटाण्याचे उत्पादन हाेते. पण आता नुकत्याच झालेल्या अध्ययनाच्या निष्कर्षामुळे चीन, कॅनडा आणि अमेरिकेत वाटाण्याचा माेठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. आता तर वाटाण्यापासून बर्गर आणि नूडल्ससुद्धा तयार करण्यात येत आहेत.वाटाण्याला हिंदीत मटार आणि इंग्रजीत ग्रीन पीज म्हणतात वाटाण्याची शेती सर्वप्रथम भूमध्य समुद्राच्या किनारपट्टीत आणि त्यानंतर आखाती देशात सुरू झाली व नंतर भारतात सुरू झाली वाटाणे ज्या समस्या दूर करू शकतात. त्या गहू, मका, साेयाबीन दूर करू शकत नाहीत. वाटाण्याच्या पिकासाठी अतिशय कमी पाणी लागते व वाटाण्याचे पीक काेरड वाहू जमिनीत सुद्धा हाेते व जास्त खत सुद्धा लागत नाही. वाटाण्यामुळे अ‍ॅलर्जी ्नवचितच हाेते. मार्केट रिसर्च फर्म मिन्टेल ने प्रसिद्ध केलेल्या माहिती नुसार गेल्या वर्षी वाटाण्याची 757 खाद्य उत्पादने बाजारात आली. हे पदार्थ वाटाण्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अमेरिकेच्या सर्वांत प्रसिद्ध मटर फूड ‘बीयाँड बर्गर’पेक्षा वेगळी आहेत. वाटाणा स्टार्च, फायबर आणि प्राेटीन या तीन वेगळ्या स्वरूपात सहज विभाजित हाेऊ शकताे. चीनमध्ये वाटाण्यातून माेठ्या प्रमाणावर प्राेटीन काढतात व त्यापासून पीस्टार्च तयार करून नूडल्स तयार करता व उरलेले प्राेटीन अमेरिकेला निर्यात करतात, आता चीन युराेपला वाटाणे व त्यापासून तयार केलेले पदार्थ निर्यात आहे.मॅककाेनल कंपनीच्या फाईन आईस्क्रिमचे 5 फ्लेवर वाटाण्यातील प्राेटीन्सपासून तयार करतात. रिपल फूडस कंपनी पिवळ्या वाटाण्याच्या प्राेटीनपासून दूध तयार करून दरराेज 70 लाख लिटर दूध विकते. अमेरिकेत आता उत्पादनावर भर दिला जात आहे.यापूर्वी अमेरिका डाळ उत्पादनाकडे दुर्लक्ष करीत असेल, पण आता डाळ उत्पादनासाठी 50 लाख डाॅलरपेक्षा जास्त र्नकम मंजूर केली असून, त्यात वाटाण्याचे पीक घेण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. कॅनडाने सुद्धा प्लांटप्राेटीन रिसर्चसाठी 11 काेटीं 50 लाख डाॅलरचे बजेट तयार केले आहे, फ्रेंच कंपनी रोक्वेट मनीटाेव्हाने वाटाण्यातून प्राेटीन काढण्याचा कारखाना सुरू करण्यासाठी 30 काेटीं डाॅलर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.