साहसी शिक्षण अभ्यासक्रमासंदर्भात पुण्याच्या संस्थेचे सादरीकरण

    23-Oct-2020
Total Views |

k,._1  H x W: 0
 
मुंबई, 22 ऑक्टाेबर (आ.प्र.) : पुण्याच्या गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग संस्थेने ‘साहसी शिक्षण अभ्यासक्रमा’बाबत क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या समाेर सादरीकरण केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाेबतच साहस प्रशिक्षण हा विषय मुलांच्या अभ्यासक्रमात असावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हाेण्यास मदत हाेईल, असे या सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.तंत्रज्ञानाच्या या काळात गॅजेट्सवर आपला जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्या मुलांना गिर्याराेहणाच्या प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास, भूगाेल या विषयाच्या अभ्यासाबराेबरच निसर्गाप्रती गाेडी निर्माण हाेण्यास नक्कीच मदत हाेईल. त्यानुसार या संस्थेमार्फत साहस प्रशिक्षणविषयक उपक्रम प्रायाेगिक तत्त्वावर राबवण्यात यावा. त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहावे, असे तटकरे यांनी सांगितले.या बैठकीस क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या उपसचिव नानल, क्रीडा उपसंचालक, रायगडचे जिल्हा क्रीडाधिकारी, शिक्षणाधिकारी, रायगडच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित हाेते. गार्डियन गिरिप्रेमीचे प्रमुख व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त उमेश झिरपे यांनी सादरीकरण केले. गिर्याराेहण व जलदुर्ग अ‍ॅडव्हेंचर यादृष्टीने सह्याद्रीच्या वैभवशाली गडकिल्ल्यांनी समृद्ध अशा रायगड जिल्ह्यातील राेहा आणि आजूबाजूचा परिसर आहे. या प्रक्षिणासाठी हे ठिकाण उत्तम ठिकाण राहील, यावर यावेळी चर्चा करण्यात आली.