ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे काय?

    20-Oct-2020
Total Views |

b6_1  H x W: 0  
 
तुम्हाला टेनिस खेळायला किंवा टेनिसच्या मॅचेस बघायला आवडतात का? सध्या ग्रँड स्लॅम स्पर्धांबद्दल बातम्या तुम्ही ऐकत असाल, परंतु नेमक्या या स्पर्धा काय आहेत, याविषयी तुम्ही माहिती मिळवली आहे का? तर या ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे वर्षातील अत्यंत महत्त्वाच्या जागतिक स्तरावरील चार टेनिस स्पर्धा असतात. टेनिस क्षेत्रात ग्रँड स्लॅम स्पर्धांना अतिशय महत्त्वाचे स्थान असते.
ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन स्पर्धानंतर येणारी अमेरिकन स्पर्धा ही टेनिस माेसमातील अखेरची ग्रँड स्लॅम स्पर्धा असते.ऑस्ट्रेलियन ओपन ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात दरवर्षी जानेवारी महिन्यात, फ्रेंच ओपन फ्रान्समधील पॅरिस शहरात मे-जून महिन्यात, विंबल्डन युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन या उपनगरांत जून-जुलै महिन्यात, तर यूएस ओपन अमेरिकेच्या न्यूयाॅर्क शहरात सप्टेंबर महिन्यात भरवली जाते. यांपैकी ऑस्ट्रेलियन ओपन व यूएस ओपन या स्पर्धा हार्ड काेर्टवर, फ्रेंच ओपन तांबड्या मातीच्या काेर्टवर, तर विंबल्डन स्पर्धा हिरवळीच्या काेर्टवर खेळवली जाते. या चारही स्पर्धा एकाच वर्षात जिंकणारा खेळाडू ग्रँड स्लॅम पूर्ण करताे.