काेराेना महामारीचा संसर्ग राेखण्यासाठी अनेक रुग्णालयांनी ऑनलाइन सल्ला देण्याचा मार्ग स्वीकारला हाेता. त्यामुळे रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावरील उपचार सुरू हाेते; पण आता निर्बंध शिथिल झाल्यामुळे अनेक डॉक्टरांनी रुग्णांची थेट तपासणी सुरू केली आहे. आपल्या प्रकृतीत बिघाड झाल्यावर डाॅ्नटरांकडे जावे लागणारच; पण अकारण घाबरू नका. खाली दिलेली लक्षणे नीट वाचा आणि मग दवाखान्यात जाण्याचा निर्णय घ्या. काेणतेही औषध डॉक्टरांना विचारल्याशिवाय मनाने न घेण्याचे पथ्य पाळा.
संध्यानंद.काॅम
महामारी राेखण्यासाठी जारी करण्यात आलेले निर्बंध आता काही प्रमाणात शिथिल झाले आहेत.दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले असून, अनेक सेवा पूर्ववत हाेत आहेत. वैद्यकीय सेवा त्यातील एक.हवामानातील बदल किंवा अन्य कारणांमुळे अनेकांची प्रकृती बिघडते. पूर्वीच्या स्थितीत लगेच डॉक्टरांकडे जाता येत हाेते. सध्या मात्र संसर्गाची भीती असल्यामुळे असे करता येत नाही; पण बरे नसले, तरी घाबरू नका.आधी आपल्याला काय त्रास हाेताेय हे जाणून घ्या आणि मगच ऑनलाइन सल्ला घ्यावयाचा की डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटावयाचे याचा निर्णय घ्या, असे तज्ज्ञांनी सुचविले आहे.
नेहमीच्या सर्वसाधारण आजारांबाबत
: 1) ताप : शारीरिक वेदनांसह ताप येणे हे सर्वसाधारणपणे विषाणू संसर्गाचे लक्षण असते आणि एक ते दाेन दिवसांत हा ताप जाताे, अशी माहिती अॅ्निसस हाॅस्पिटलच्या इंटर्नल मेडिसीन विभागातील डाॅ. सलाह कुरेशी यांनी दिली. ही लक्षणे असल्यास डॉक्टरांना विचारून दिवसातून तीन वेळा ‘पॅरासिटामाेल’ गाेळ्या घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र तापाशिवाय खाेकला, घसा काेरडा पडणे, लघवी करताना जळजळ हाेणे, अशी लक्षणे असल्यास त्वरित डाॅ्नटरांकडे जावे, असे त्यांनी सांगितले.
2) खाेकला : अॅलर्जी आणि अॅसिडिटीसारख्या साध्या लक्षणांपासून फुफ्फुसांच्या गंभीर संसर्गापर्यंतच्या कारणांनी खाेकला हाेऊ शकताे, असे डाॅ. कुरेशी यांनी सांगितले. अॅलर्जी आणि अॅसिडिटीमुळे येत असलेल्या खाेकल्यावर कफसिरप उपयाेगी पडते; पण खाेकल्याबराेबर ताप येत असेल आणि श्वासाेच्छ्वास करण्यास त्रास हाेत असेल, तर तुम्हाला डाॅ्नटरांकडे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
3) डाेकेदुखी : डाेकेदुखीचा नेहमी त्रास हाेत असलेल्यांना काय करावे हे माहिती असते. ‘क्राेसिन’ किंवा ‘सॅरिडाॅन’सारख्या गाेळ्या त्यात उपयाेगी पडतात. त्याशिवाय प्रखर प्रकाशात जाण टाळणे, माेठ्या आवाजापासून दूर राहणे आणि माेबाइल, तसेच टीव्हीच्या पडद्यांपासून लांब राहण्याचा उपायही सांगितला जाताे. पण डाेकेदुखीबराेबर उलट्या, गुंगी येणे आणि खूप थकवा येत असेल, तर लगेच डॉक्टरांकडे जावे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
4) पाठ आणि मानदुखी : डॉक्टरांनी टेलिकन्सलटेशनच्या माध्यमातून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरील औषधे घेऊन या आजारातून बरे हाेता येते.तणावमुक्तीचे आणि स्ट्रेचिंगचे थाेडे व्यायामही करता येतात; पण दुखणे तीव्र असेल, तर डाॅ्नटरांकडे जाऊन इलाज करा, असा सल्ला अपाेलाे स्पेक्ट्रा हाॅस्पिटलमधील इंटर्नल मेडिसीनतज्ज्ञ डाॅ. तुषार राणे यांनी दिला आहे.
5) अतिसार : विषाणू संसर्गामुळे अतिसाराचा त्रास हाेत असल्याची माहिती डाॅ. कुरेशी यांनी दिली; पण जास्त त्रास हाेत असेल, तर द्रवपदार्थ घेणे वाढवावे. या त्रासात अँटिबायाेट्निसची गरज नसते. मात्र, उलट्याही हाेत असतील आणि थकवा येत असेल, तर डाॅ्नटरांकडे जाऊन इलाज करून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
6) मधुमेह आणि थायराॅइडची समस्या : या दाेन्ही त्रासांसाठी तुम्ही आधीपासून औषधे घेत असाल, तर तुमचे डाॅ्नटर टेलिकन्सलटेशनच्या माध्यमातून तुम्हाला सल्ला देऊ शकतात, असे झेन मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलमधील फिजिशियन डाॅ. विक्रांत शहा यांनी सांगितले.