जगातील सर्वांर्त माेठा सूर्य मासा

    17-Oct-2020
Total Views |
 
g6;_1  H x W: 0
 
सूर्यमासा हा माेलिडी (Molidae) कुलातील जगातील सर्वांत माेठा मासा आहे. त्याला माेला असेही म्हणतात. वैज्ञानिकांनी अलीकडेच या माेहक माशांची पिल्ले शाेधली असून ती इतकी लहान असतात की बाेटांच्या टाेकावर डझनभर पिल्ले मावू शकतात. प्राैढ सूर्यमासे मात्र जगातील अत्यंत वजनदार कास्थी (bony) मासे आहेत. त्यांची लांबी जवळपास तीन मीटर असते आणि वजन दाेन हजार किलाेग्रॅमपेक्षाही जास्त असते. त्यांचा आकारही अत्यंत विचित्र आणि वेगळाच असताे.काहीसा पसरट, गाेल व त्यावर माेठे वरचे पर असते. त्याचे शरीर मात्र माशासारखे लांब निमुळते नसते. अत्यंत आखूड शरीराला शेपूट व शेपटीचे पर देखील नसते. पण या माशांची पिल्ले मात्र वेगळीच असतात. त्यांची लांबी काही मिलिमीटरमध्ये असते. पण ते माेठ्या माशांचे सारखे दिसत नाहीत. त्यामुळे शास्त्रज्ञ ही पिल्ले याेग्य प्रजातीच्या माेला माशाशी अनुरूप आहेत की नाही हे शाेधत हाेते. पहिल्यांदाच डीएनए अनुक्रमामुळे (DNA sequencing) माेठ्या दणकट डाेक्याच्या सूर्य माशाच्या पिलांचा शाेध घेण्यात शास्त्रज्ञांना यश आले. हा मासा ऑस्ट्रेलियन म्युझियममध्ये आहे. माेलीडी कुलात सहा प्रजाती आहेत व त्या जगभरातील महासागरात आढळतात.त्यांच्या विशिष्ट आकारावरून त्यांना तऱ्हेवाईक नावे दिलेली आहेत. त्यांना फ्रेंचमध्ये चंद्रमासा तर डॅनिश भाषेत माेठ्या डाेक्याचा मासा म्हणतात जर्मन भाषेत पाेहणारे डाेके असेही म्हटले जाते.या माशांची पिल्ले अत्यंत लहान असून त्यांना शाेधणे व ओळखणेही कठीण असते. परंतु 2017 मध्ये न्यू साऊथ वेल्स दक्षिणपूर्व ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर काम करणाऱ्या संशाेधकांनी या माशाच्या पिल्लांना गाेळा करण्यात यश मिळविले.त्यांची लांबी फक्त पाच मिलिमीटर हाेती. अनुवंशिक अनुक्रमांकासाठी अत्यंत काळजीपूर्वक एका पिलाचा डाेळा त्यांनी काढला. या पिलास कमीत कमी इजा हाेईल अशी दक्षता घेतली आणि त्यातून वापरता येईल असे डीएनए काढण्यात आले. माेठ्या माशांच्या डी एन ए शी पडताळून पाहिले, त्याची तुलना केली आणि ताे नमुना माेला अलेक्झांड्रीनी या माशाशी जुळला. या अत्यंत लहान जीवाची ओळख झाल्यावर ताे जीव मात्र पूर्ण वाढ झालेल्या माशापेक्षा सहाशे पटीने लहान हाेता. संशाेधक या पिलांची पडताळणी किंवा तुलना अनाेळखी माेला पिलांशी करीत आहेत.ही पिले ऑस्ट्रेलियात म्युझियम अँड काॅमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च ऑर्गनायझेशन, हाेबार्ट, ऑस्ट्रेलिया येथे आहेत. त्यातील अधिक पिले सारखीच आढळतात का? हे पाहणे चालू आहे.हे काम ऑकलंड वाॅर मेमाेरियल म्युझियमचे वैज्ञानिक मारियन नायगार्ड या पिलांचे परीक्षण करीत आहेत. सूर्य माशाच्या आणखी चार प्रजाती ऑस्ट्रेलिया भाेवतालच्या समुद्रात आढळतात. त्यात सागरी सूर्य मासा (Mola mola), फसविणारा सूर्य मासा (Mola tecta), बिंदू शेपटीचा सूर्य मासा (Masturus lanceolatus ) आणि चाैथा प्रकार म्हणजे लांबट सूर्य मासा (Tanzania laevis ) असे विविध प्रकार आढळतात. सूर्य माशांवरील संशाेधनात अत्यंत छाेट्या पिलांचा शास्त्रज्ञांना या माशाचे जीवनचक्र जाणून घेण्यासाठी उपयाेग हाेईल. आपल्याला या महासागरातील महाकाय सूर्य माशांचे संरक्षण करायचे असेल तर त्यांचा संपूर्ण जीवन इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. त्यात पिल्ले कशी दिसतात आणि ती काेठे आढळतात याचाही शाेध घेता येईल, असे वैज्ञानिक नायगार्ड म्हणाले.
-प्राचार्य डाॅ. किशाेर पवार माे. 9423173388