पूर्ण विचार करूनच निवडा तुमचे डाएट...

    17-Oct-2020
Total Views |
काेणत्या काळात कशाला महत्त्व येईल हे सांगता येत नाही. सध्या बहुतेक लाेक आराेग्याविषयी जागरूक झाले आहेत किंवा आजच्या भाषेत ‘हेल्थ काॅन्शस’ झाले आहेत. व्यायामाच्या विविध प्रकारांबराेबरच आहारपद्धतीवर सध्या भर आहे.आहाराची काेणती पथ्ये, म्हणजे ‘डाएट’ पाळावीत याबाबत मतमतांतरे आहेत. प्रत्येक ‘डाएट’चे फायदे-ताेटे वेगवेगळे असल्याने आपण नक्की काेणती पद्धत अनुसरावी, हा प्रश्न पडताे. तुमच्या या शंकांबाबत तज्ज्ञ काय सांगताहेत ते वाचा...
 
bh7_1  H x W: 0
सुदृढ आणि निराेगी शरीरासाठी आहारपद्धत आणि त्यासंदर्भातील पथ्ये किंवा नियंत्रणांना फार महत्त्व आहे.संपूर्ण शरीराचा विचार करणाऱ्या प्राचीन आयुर्वेदाने तर त्यावर जास्त भर दिला आहे. उदा. काेणत्या ऋतूमध्ये काय आहार असावा, प्रदेशातील हवामानानुसार काय खावे, रात्री काय खाणे टाळावे, पाणी किती प्यावे आदी सर्वांचा त्यात बारकाईने विचार केल्याचे दिसते. तसेही पाहिले, तर निराेगी जीवनासाठी स्वत:वर नियंत्रणे हवीतच. आहाराची पथ्येही पाळली पाहिजेत.पण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने एकाचे पथ्य दुसऱ्याला उपयुक्त ठरेल असे नसते. त्याचा निर्णय डॉक्टर घेतात.सध्याच्या वेगवान आयुष्यात सर्व पथ्ये पाळणे श्नयच नाही. पण अयाेग्य आहार, अवेळी खाणे, जागरणे आदींमुळे प्रकृती बिघडते. त्यातून मग ‘डाएट’ येते. ‘डाएट’ म्हणजे आपण पाळलेले पथ्ये असे साेप्या भाषेत सांगता येईल.आपल्या परिचितांकडे पाहा. ते काेणत्या ना काेणत्या ‘डाएट’च्या मागे असल्याचे सहसा दिसते. काेणी दिवसातून दाेनदाच जेवणारे, काेणी फळांवर भर देणारे, काेणी सकाळी भरपेट नाष्टा करून दुपारी फक्त सॅलेडवर राहणारे असे असंख्य प्रकार असतात. सध्याच्या काळात काेणत्याही प्रकारची प्रसिद्धी वेगाने हाेते. ‘डाएट’ही त्याला अपवाद नाही. दीक्षित, वेगन, केटाे, मेडिटेरियन आदी ‘डाएट’ प्रकार आपल्या कानांवर आलेले असतात आणि इच्छा असलेले लाेक हे ‘डाएट’ पाळत असतात. पण खरेच त्याचे फायदे हाेतात का? पथ्य ही गाेष्ट तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पाळावयाची गाेष्ट आहे हे विसरून चालणार नाही. पाहूयात तज्ज्ञ काय म्हणतात ते...एका बहुराष्ट्रीय कंपनीतून निवृत्त झालेल्या टी.पी.सी. मणी यांची प्रकृती वयाच्या 67 व्या वर्षीही ठणठणीत आहे. गेले 15 महिने ते दिवसातील 17 ते 18 तास उपाशीच असतात.ते दिवसातून दाेनदा जेवतात आणि त्यात किमान सहा ते सात तासांचे अंतर ठेवण्याची दक्षता घेतात. दिवसभरात भुकेची जाणीव हाेऊ नये म्हणून पाणी आणि ताकाचे ते आलटूनपालटून सेवन करतात. हे पथ्य सुरू करण्यापूर्वी मणी यांचे वजन 78 किलाे हाेते आणि नंतर दाेन महिन्यांत त्यांचे वजन पाच किलाेने कमी झाले. आता त्यांचे वजन 70 किलाे असून, ते कायम राहिले आहे. ‘हे डाएट सुरू करण्यापूर्वी मी अनेक प्रकार करून पाहिले; पण त्यांचा उपयाेग झाला नाही,’ असे ते सांगतात. सकाळी ते भरपेट नाष्टा करतात आणि दुपारी दाेन वाजता जेवतात. नंतर थेट दुसऱ्या दिवशीच पुन्हा नाष्टा करतात. मला आता याची सवय झाली आहे. पाणी आणि ताक घेत असल्यामुळे मला भुकेची जाणीव हाेत नाही. जाेपर्यंत मी दिवसातून दाेनदाच खाताे आहे ताेपर्यंत मी काय आणि किती खाताे याची काळजी नाही. या डाएटचा फायदा असल्याचे मणी यांनी सांगितले. मात्र, खराेखरच खूप भूक लागल्याशिवाय मी काही खात नाही, असेही ते स्पष्ट करतात.