जिल्हा पथकाकडून दाैरे करून तालुकानिहाय आराेग्य व्यवस्थेचा आढावा

    17-Oct-2020
Total Views |
पुणे, 16 ऑक्टाेबर (आ.प्र.) : पुणे जिल्ह्यात काेराेनाबाबत उपाययाेजना व आराेय व्यवस्थेच्या सुविधांची माहिती घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चार जिल्हा पथकांनी जिल्ह्यात दाैरे करून आराेग्यविषयक आढावा घेतला.या पथकाने जिल्ह्यात तालुकानिहाय आराेग्यविषयक उपाययाेजनांचा आढावा घेतला. यामध्ये स्वत: जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुखही सहभागी झाले हाेते.
पहिल्या पथकामध्ये स्वतः जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप काेहिनकर यांचा समावेश हाेता. या पथकाने दाैंड, इंदापूर, बारामती व पुरंदर तालुक्यांतील माझे कुटुंब माझी जबाबदारी माेहीम, काेविड व्यवस्थापन, डाटा रिकन्सीलेशन, डाटा अपडेशन, गंभीर रुग्णांची व्यवस्था, लाेकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर केलेली कार्यवाही याबाबतचा आढावा घेतला.दुसऱ्या पथकामध्ये स्वतः अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. अभय तिडके, यांनी भाेर, वेल्हा, मुळशी व मावळ तालुक्याचा दाैरा करून आढावा घेतला.तिसऱ्या पथकात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे, निवासी आराेग्य अधिकारी डाॅ. संताेष देशपांडे यांनी खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांतील आराेग्य व्यवस्थेची पाहणी करून आढावा घेतला.