जपानच्या थीम पार्कमध्ये एक नवा पाहुणा आला आहे. या पाहुण्याने आल्या आल्याच लहानथाेरांची मने जिंकली आहेत. हा गाॅडझिलाचा पुतळा. मात्र, ताे काही लहानसहान पुतळा नाही.त्याची उंची तब्बल 75 फूट आहे.काही देशांमध्ये आता पर्यटनाला सुरुवात झाली असून, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या यु्नत्यालढवल्या जात आहेत. गाॅडझिलाचा पुतळा ही एक आकर्षक युक्ती आहे. हा पुतळा जपानमधील काेबे या शहरातील थीम पार्कमध्ये बसवण्यात आला असून, गाॅडझिलाच्या ताेंडाजवळ उभे राहून फाेटाे काढण्याची आता चढाओढ सुरू झाली आहे.एकूणच माेठमाेठे पुतळे उभारण्याची सध्या लाट आली असून, त्याचे मूळ हाॅलिवूडपटांमध्ये आहे. गाॅडझिलाचा हा पुतळा वास्तविक 50 मीटर उंच हाेता. पण गेल्या वर्षी आलेल्या गाॅडझिला या चित्रपटात ताे 120 मीटर उंच दाखवला हाेता. टाेकियाे शहरात टाेहाे इमारतीत गाॅडझिलाचा पुतळा 12 मीटर उंच आहे.