प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी देणार महिला प्राध्यापकांना भरपाई

    17-Oct-2020
Total Views |
न्यूयाॅर्क, 16 ऑ्नटाेबर (वि.प्र.) : महिलांना शिक्षण अध्यापनाच्या क्षेत्रात असमान वागणूक दिल्याचे सिद्ध झाल्याने जगातील प्रतिष्ठित प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आता सर्व महिला प्राध्यापकांना पगारातील फरक म्हणून सात काेटी रुपये वाटणार आहे.2014 पासून याबाबत तक्रारी येत हाेत्या.अमेरिकेच्या लेबर खात्याने त्याची दाखल घेऊन चाैकशीचे आदेश दिले हाेते. महिला आणि पुरुषांच्या पगारात फरक केल्याबद्दल युनिव्हर्सिटीने एक समिती नेमून चाैकशी केली हाेती. तीत फरक आढळल्याने आता भरपाई दिली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीने फरकाचे आराेप फेटाळून लावले. मात्र, प्रकरण काेर्टात गेल्याने त्याचा हाेणारा खर्च, तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना हाेणारा त्रास लक्षात घेता भरपाई देण्याचा निर्णय झाला.