साैदी अरेबियातील लिलावात ससाण्याला सव्वा काेटींची किंमत

    17-Oct-2020
Total Views |
 
v67'_1  H x W:
 
रियाध, 16 ऑक्टोबर (वि.प्र.) : साैदी अरेबियाची राजधानी रियाध येथे बहिरी ससाण्यांचा लिलाव 3 ऑक्टाेबरपासून सुरू झाला असून, जगभरातून या लिलावासाठी ससाणा प्रेमी रियाध येथे दाखल झाले आहेत.मंगळवारी येथे एका ससाण्याला 17 लाख 3284 डाॅलर्स म्हणजे तब्बल 1 काेटी 27 लाख रुपये किंमत मिळाली.साैदी फाल्कन क्लब तर्फे या लिलावाचे आयाेजन मुलहम राजे अब्दुल अझीज फेस्टिव्हल मैदानात करण्यात आले आहे.15 नाेव्हेंबरपर्यंत म्हणजे 43 दिवस हा लिलाव सुरू राहणार आहे. 1 काेटी 27 लाख रुपयांची किंमत ही आत्तापर्यंत मिळालेल्या किमतीत विक्रमी आहे. देश विदेशातून शेकडाे ग्राहक या लिलावासाठी जमले असले, तरी काेराेनामुळे मर्यादित संख्येनेच ग्राहकांना परवानगी दिली जात आहे. मैदानाचा परिसर 2 हजार चाैरस मीटर असूनही हे मैदान ग्राहकांना अपुरे पडत आहे.या लिलावात पहिला लिलाव युवा शाहीन श्रेणीतील ससाण्यांचा केला गेला.त्यात पहिला ससाणा 21,48,518 रुपयांना, दुसरा ससाणा 24,41,953 रुपयांना, तर तिसरा 14,65,171 रुपयांना विकला गेला. या लिलावाचा मुख्य हेतू व्यापार आणि व्यवसाय यांना प्राेत्साहन मिळावे आणि त्यामुळे गुंतवणुकीच्या संधी वाढाव्यात हा आहे. या निमित्ताने ससाणे शाैकिनांची संख्या वाढावी असाही प्रयत्न केला जात आहे.