अमेरिकेत सापडला अर्धनारीनटेश्वर पक्षी

    17-Oct-2020
Total Views |
 
n8;_1  H x W: 0
 
अमेरिकेतील पेनसिल्वानियामध्ये एक अनाेखा पक्षी सापडला आहे. हा पक्षी अर्धा नर आणि अर्धी मादी आहे. या पक्ष्याचे नाव राेज-ब्रेस्टेड ग्रूजबीक्स असे आहे. या पक्ष्याच्या एका बाजूला नराप्रमाणे काळे आणि माेठे पंख, तर दुसऱ्या बाजूला मादीप्रमाणे तपकिरी आणि पिवळे पंख आहेत. मादीच्या छातीवर ठिपका नसताे. विशेष म्हणजे तब्बल 64 वर्षांनी असा पक्षी सापडल्याची माहिती संशाेधकांनी दिली आहे.नर पक्ष्याचे दाेन स्पर्म मादीच्या न्यूक्लियस असलेल्या अंडाशयात जातात, तेव्हा भ्रूणात नर आणि मादी दाेघांचीही गुणसूत्रे येतात. तेव्हा असा पक्षी जन्माला येताे. 64 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या एका संशाेधन केंद्रातही असा पक्षी सापडला हाेता. हा पक्षी साधारणतः उत्तर अमेरिकेत आढळताे. जर या पक्ष्याने स्थलांतर केले, तर ते मेक्सिकाे आणि दक्षिण अमेरिकेत जाऊ शकतात. हा पक्षी कार्डिनल फॅमिलीतील आहे. या पक्ष्यात उजवा भाग मादीचा आहे. त्यामुळे ताे अंडेही देऊ शकताे.