अस्तित्व धाेक्यात आले आहे. कारण इथल्या 80 टक्के बेटांवरील पाण्याची पातळी सुमारे एक मीटरने वाढली आहे. मात्र, त्यावर मात करण्यासाठी मालदिवने हुलहूमाले या नव्या शहराची निर्मिती सुरू केली हाेती. हे शहर आता आकाराला आले असून, या शहराला ‘सिटी ऑफ हाेप’ असेही संबाेधण्यात येत आहे.
काही जण पर्यटनासाठी गेले असतील.सुंदर समुद्रकिनारे हा या देशाचे वैशिष्ट्य आहे; परंतु या सुंदर देशाला हवामान बदलाविषयक पर्यावरणीय संकटांना ताेंड द्यावे लागत आहे. देशातील समुद्रकिनाऱ्यांवरचे रिसाॅर्ट जगभरात लाेकप्रिय आहेत. पण आता त्यांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे. कारण इथल्या 80 टक्के बेटांवरील पाण्याची पातळी सुमारे एक मीटरने वाढली आहे.मात्र, त्यावर मात करण्यासाठी मालदीवने हुलहूमाले या नव्या शहराची निर्मिती सुरू केली हाेती. हे शहर आता आकाराला आले असून, या शहराला ‘सिटी ऑफ हाेप’ असेही संबाेधण्यात येत आहे.समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्याने मालदीवमध्ये समुद्रातील वाळूचाच वापर जमिनीची उंची वाढवण्यासाठी करण्यात येणार आहे.या वाळूच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या बेटाची उंची समुद्रसपाटीपेक्षा दाेन मीटर उंच असेल. या कामाचा पहिला टप्पा 1997 मध्ये सुरू झाला हाेता. आता 2019च्या अखेरपर्यंत हुलहूमाले शहराला आकार आला हाेता आणि आता येथे मनुष्यवस्तीही आहे.आता याठिकाणी 2 लाख 40 हजार नागरिक राहू शकतील, अशा प्रकारे साेयीसुविधा देण्याबाबत नियाेजन करण्यात आले आहे.नव्या शहराची रचना करताना हवामान बदलाच्या संकटाचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. येथील इमारती आणि वसाहतींची रचना अतिशय सुयाेग्य पद्धतीने करण्यात येईल, अशी माहिती ‘सिटी ऑफ हाेप’ प्रकल्पातील हाऊसिंग डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशनचे संचालक अरीन अहमद यांनी दिली.उष्णता राेखण्यासाठी इथल्या इमारती उत्तर-दक्षिण दिशेने बांधण्यात येत आहेत.यामुळे परिसरात थंडावा राहील. शाळा, मशीद आणि पार्क रहिवासी भागातून पायी अंतरावरच असतील, यामुळे वाहनांचा वापर मर्यादित राहील. नव्या शहरात विजेवर चालणाऱ्या बस, सायकल यांना प्राधान्य असेल. शिवाय, साैरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे.रेनवाॅटर हार्वेस्टिंगमुळे पाण्याचा साठा मुबलक राहणार आहे.
शहराचे हे चित्र कितीही आकर्षक दिसत असले, तरी कृत्रिम बेटनिर्मिती पर्यावरणासाठी समस्या निर्माण करू शकते, अशी भीतीही पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.