यंदा दिवाळीत तेवणार गाईच्या शेणाच्या पणत्या

    17-Oct-2020
Total Views |
राष्ट्रीय कामधेनू आयाेगाकडून निर्मितीला प्रारंभ
 
mlp;_1  H x W:
 
नवी दिल्ली, 16 ऑ्नटाेबर (वि.प्र.) : चिनी बनावटीच्या पणत्यांना पर्याय म्हणून भारतात गाईच्या शेणापासून तयार केलेल्या मातीच्या पणत्या यंदाच्या दिवाळीत दिसतील. अशा 33 काेटी पणत्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट राष्ट्रीय कामधेून आयाेगाने निश्चित केले आहे.
दिवाळी हा देशातील सर्वांत माेठा सण असून, ताे पुढील महिन्यात म्हणजे नाेव्हेंबरमध्ये येत आहे. भारतीय बाजारपेठेवर हाेत असलेले चिनी वस्तूंचे आक्रमण राेखण्यासाठी या पणत्यांची निर्मिती केली जात असल्याची माहिती राष्ट्रीय कामधेनू आयाेगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांनी दिली. देशी गाईंच्या संवर्धन, संरक्षण आणि संगाेपनासाठी 2019 मध्ये हा आयाेग स्थापन करण्यात आला आहे.गाईच्या शेणापासून बनविलेल्या विविध वस्तूंचा वापर दिवाळीत करावा आणि चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘मेक इन इंडिया’वर भर दिला असून, स्वदेशी वस्तूंच्या वापराचे आवाहन केले आहे. आम्ही त्यांना साथ देत आहाेत, असे कथिरिया यांनी सांगितले. दिवाळीत याच पणत्या वापरण्यासाठी सुरू झालेल्या माेहिमेत आतापर्यंत पंधरा राज्ये सहभागी झाली आहेत.दिवाळीत अयाेध्येत अशा तीन लाख आणि वाराणसीमध्ये एक लाख पणत्यांची राेषणाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिवाळीपूर्वी अशा 33 काेटी पणत्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट आम्ही ठेवले असून, काम सुरू झाले आहे. देशात राेज सुमार 192 काेटी किलाे गाईचे शेण मिळते, असेही कथिरिया यांनी सांगितले.