आनंदी व्हायचे आहे? अप्रिय भूतकाळ विसरा!

    17-Oct-2020
Total Views |
भूतकाळातील अप्रिय अनुभवांना वारंवार आठविल्याने वर्तमानात निराशा हाती येते. जर तुम्ही एक आनंदी जीवन जगू इच्छित असाल तर, अप्रिय भूतकाळापासून सुटका मिळविणे खूप आवश्यक आहे.
 
b67_1  H x W: 0
 
दुसऱ्यांबराेबर नकारात्मक आणि अप्रिय अनुभवांविषयी बाेलू नका. आपले काेच किंवा काेणत्या अशा व्य्नतीशी बाेलण्याचा प्रयत्न करा, जे या स्थितीत तुम्हाला याेग्य ते मार्गदर्शन करू शकतील. जर तुम्ही अप्रिय गाेष्टींविषयी बाेलत राहिलात तर तुम्ही जीवनात अधिक निराशा आणि दु:खाला आमंत्रित कराल. त्याव्यतिर्नित आपल्या मेंदूला वळण लावा. काही प्रेरणादायी वाचा आणि त्या सर्व गाेष्टींविषयी विचार करणे सुरू करा, ज्यांचा आपल्या आयुष्यात अनुभव घ्यावा असे तुम्हाला वाटते. एक लिस्ट बनवा.
त्यामध्ये ते सर्व लिहा ज्याविषयी तुम्ही असे मानता की, तुम्ही त्या प्राप्त करण्यायाेग्य आणि त्याला आकर्षित करण्यायाेग्य आहात. याला राेज वाचा. हा सरळ व्यायाम तुमच्या कंपनांना वाढवील आणि तुम्हाला सकारात्मक विश्वास आणि आशा यांनी भरून टाकील.
दुसऱ्यांना माफ न करणे खुशी आणि शांतीच्या रस्त्यातील प्रमुख अडथळा आहे. जर तुम्ही दुसऱ्यांच्या विषयी राग आणि दु:ख कायम ठेवणार असाल तर, त्या भावना तुमच्या जीवनाचा भाग हाेऊन राहतील. भूतकाळातील प्रभावांना वर्तमानाच्या श्नतीनेच दूर केले जाऊ शकते. आणि ती श्नती तुमच्याजवळ आहे. कारण तुम्हीच तुमच्या प्रतिक्रियांना नियंत्रित करू शकता. या व्यायामाला राेज करा. त्यांच्याविषयी विचार करा, ज्यांच्याविषयी तुमच्या मनात राग असेल. आणि मग त्यांना मानसिक रूपाने आशीर्वाद द्या.
युनिव्हर्सवर विश्वास ठेवा. स्वत:ला आठवण करून द्या की, तुम्ही एका समृद्ध, प्रेममय आणि मदत करणाऱ्या ब्रह्मांडात राहत आहात. प्रत्येक रात्री जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा आपले सर्व ओझे ब्रह्मांड या सर्वाेच्च श्नतीला द्या. मानसिक रूपाने पुन्हा पुन्हा म्हणा, ‘मी आपले सर्व विचार आणि भावना प्रिय भगवान / ब्रह्मांडाला देताे आणि मी आता स्वतंत्र आहे.’ यामुळे तुम्हाला भूतकाळातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. आपल्या मनात यशाच्या बळकट प्रतिमांना पकडा. त्या सर्व बाबींविषयी विचार करणे सुरू करा, ज्या तुमच्या जीवनात काम करू शकतात. आपले डाेळे बंद करा आणि आपली इच्छा आणि लक्ष्य यांच्यासह स्वत:ला स्पष्ट रूपाने पाहणे सुरू करा. काेणत्याही विषयावर आपले लक्ष केंद्रीत केल्यानंतर काही सेकंदात तुम्ही तुमच्या आतमध्ये त्या विषयाच्या कंपनाला सक्रिय करणे सुरू करता.